Join us

आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : उत्तन येथे एका १५ वर्षांच्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : उत्तन येथे एका १५ वर्षांच्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे . हे आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.

पीडित मुलगी ही तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसली असताना त्यावेळी तिघे आरोपी तेथे आले. त्यांनी अल्पवयीन मुलींना दमदाटी करून बळजबरी करू लागले. पीडितेची मैत्रीण व तिचे दोन मित्र कसेतरी त्यांच्या तावडीतून निसटले. त्यांनी घरी जाऊन सदर प्रकार सांगितला. दरम्यान, तिघांनी पीडितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला आणि पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत लागीं व पोलीस पथकाने तातडीने तपास सुरू करत त्या तिघाही आरोपींना अटक केली, तर पीडितेस उपचारासाठी व तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणे न्यायालयात बुधवारी तीनही आरोपींना हजर केले असता न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.