पर्यटकांना लुटणारी टोळी गजाआड
By admin | Published: December 6, 2014 10:16 PM2014-12-06T22:16:33+5:302014-12-06T22:16:33+5:30
रायगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील पर्यटकांना लुटणा:या आरोपीला पाचाडमधील तरुणांनी मुद्देमालासह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.
Next
महाड : रायगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील पर्यटकांना लुटणा:या आरोपीला पाचाडमधील तरुणांनी मुद्देमालासह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. नामदेव किसन औकीरकर उर्फ मन्या (28) असे या आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे.
नामदेव हा रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीतील मूळचा रहिवासी असून त्याच्यावर सांगली, पुणो जिल्ह्यासह माणगाव, रोहा आदी ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनमुळे एकच खळबळ उडाली आहे.
रायगडावर पर्यटनासाठी आलेल्या मिताली रतीश नायर (रा. मुलुंड, मुंबई) याच्या बॅगेतून 75 हजार रु. रोख रक्कमेसह कॅमेरा शुक्रवारी रात्री चोरीस गेला होता. नायर हा आपल्या मैत्रिणींसह रायगड किल्ल्यावर आल्या होत्या. गडावरील एमटीडीसीच्या खोलीत त्या रहायला होत्या. शुक्रवारी रात्री 8वा.त्या मैत्रिणींसह कॅन्टीनमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. त्या जेवून खोलीकडे परतल्या. त्यावेळी खोलीचा दरवाजा खुला होता. त्या खोलीत गेल्या त्यावेळी बॅगेतील रोख रक्कम रु. 75 हजार व कॅमेराही गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी आरडाओरड झाल्यानंतर स्थानिकांनी मन्या औकीकरला पकडले. याबाबत नायर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
च्पाचाड गावातील तरुणांना माहिती चोरीची मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून मन्या औकिरकर याला गडाच्या चित्त दरवाजवळ मुद्देमालासह रात्री 11.क्क् वा. पकडले आणि चोर दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेल्या रक्कमेपैकी 17 हजार 43क् रुपये व कॅमेरा ताब्यात घेतला.
च्गडाच्या पायथ्याशी ग्रामीण पोलीस ठाण्याचा पोलीस औट पोस्ट देखील आहे. मात्र त्या ठिकाणी कोणीही पोलीस कर्मचारी तैनात नसतो. तर औट पोस्टदेखील अत्यंत बिकट अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस चौकीची दुर्दशा झाल्याने कर्मचारी याठिकाणी थांबत नाहीत.
च्रायगडावर येणा:या पर्यटकांच्या खोलीमधून रोख रक्कम मोबाईल आदी किंमती वस्तू गायब होण्याचे प्रकार वारंवार होतात. मात्र पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून पर्यटकांकडून चोरी प्रकरणाबाबत तक्रारी केल्या जात नव्हत्या. सध्या पर्यटकाना हंगाम असल्याने याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.