गँगस्टर कुमार पिल्लेच्या आवाजाचे नमुने घेतले
By admin | Published: July 3, 2016 03:38 AM2016-07-03T03:38:01+5:302016-07-03T03:38:01+5:30
गँगस्टर कुमार पिल्लेच्या आवाजाचे नमुने अखेर गुन्हे शाखेने घेतले असून ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापूर्वी २००९ मध्ये गुन्हे शाखेने त्याचा आवाज
मुंबई : गँगस्टर कुमार पिल्लेच्या आवाजाचे नमुने अखेर गुन्हे शाखेने घेतले असून ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापूर्वी २००९ मध्ये गुन्हे शाखेने त्याचा आवाज रेकॉर्ड केला होता. दोन्ही आवाजांच्या नमुन्यांमध्ये साम्य आहे का, याची पडताळणी करण्यात येत आहे.
कुमार पिल्लेकडे सध्या तीन गुन्ह्यांची कसून चौकशी गुन्हे शाखा करत आहे. २००९ साली विक्रोळी येथील शहा विकासकाला फोन करून ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकावले होते. त्यानंतर त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली होती. तर यातील तिघांना मोक्का न्यायालयाने दोषी ठरविले होते. गुन्हे शाखेने कुमार पिल्लेचा आवाज रेकॉर्ड केला होता. पिल्लेचे दोन्ही आवाज जुळले तर याच गुन्ह्यांत कोठडी वाढवून या पसार आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)