Join us

गँगस्टर गुरू साटम पुन्हा सक्रीय?

By admin | Published: December 07, 2014 2:26 AM

शहरातील नामांकित बिल्डरला खंडणीसाठी धमकावणा:या गँगस्टर गुरू साटमच्या पुतण्याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने काल दादर परिसरातून रंगेहाथ अटक केली.

मुंबई : शहरातील नामांकित बिल्डरला खंडणीसाठी धमकावणा:या गँगस्टर गुरू साटमच्या पुतण्याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने काल दादर परिसरातून रंगेहाथ अटक केली. पंकज साटम उर्फ काण्या (32) असे आरोपीचे नाव आहे. बिल्डरकडून दहा लाखांचा पहिला हप्ता घेताना पंकजला अटक झाली. या कारवाईमुळे गँगस्टर साटम अंडरवल्र्डमध्ये सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकेकाळी डॉन छोटा राजनचा विश्वासू हस्तक असलेला साटम सध्या परदेशात दडून आहे. राजन टोळीतून फुटल्यानंतर स्वतंत्र टोळी निर्माण करून गुन्हे करणा:या साटमने काही दिवसांपुर्वी बिल्डरकडे 5क् लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केल्याने साटमने सहायकाला फोन करून खंडणी मिळाली नाही तर बिल्डरची हत्या करू, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. कालांतराने साटमच्या हस्तकांनी फोन करून धमक्या सुरू केल्या. अखेर बिल्डरने गुन्हे शाखेचे प्रमुख सदानंद दाते यांची भेट घेऊन तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने तपास सुरू केला होता. 
साटमच्या हस्तकांनी पहिला हप्ता म्हणून दहा लाखांची रोकड घेऊन बिल्डरच्या सहाय्यकाला दादर परिसरात बोलावून घेतले. काल त्यांची भेट होणार होती. त्यानुसार खंडणीविरोधी पथकातील अधिकारी कर्मचा:यांनी वेश बदलून सापळा रचला. त्यात पंकज खंडणीची रक्कम घेताना रंगेहाथ पकडला गेला. न्यायालयाने पोलीस कोठडीत धाडलेल्या पंकजकडे खंडणीविरोधी पथक कसून चौकशी करते आहे. साटमने शहरातल्या आणखीही 
काही बिल्डरांना खंडणीसाठी धमकावल्याचा अंदाज या पथकाला आहे. त्यानुसार चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ अधिका:याने लोकमतला सांगितले.  (प्रतिनिधी) 
 
सुरुवातीला गँगस्टर साटम परदेशी सीमकार्डावरून बिल्डरला धमकावत होता. मात्र त्याच्या हस्तकांनी थेट मुंबईतल्या पीसीओवरून फोन करून धमक्या देण्यास सुरूवात केल्याने या प्रकरणातील गांभीर्य वाढल्याची माहिती मिळते. पीसीओवरील फोनने साटम टोळीचे मुंबईतले अस्तित्व स्पष्ट केले.