चांदिवली : पूर्व उपनगरांमध्ये सुरपरिचित असलेल्या चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाही सामाजिक संदेश देणारा चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे. सद्गुरू आणि भोंदूबाबा यांच्यातील भेद सामान्यांनी जाणला पाहिजे, जेणोकरून भोंदूबाबांच्या भूलथापांना कोणी बळी पडणार नाही, हा संदेश येथे दिला जात आहे. हा चलचित्र देखावा पाहण्यासाठी परिसरातील गणोशभक्त हजारोंच्या संख्येने दाखल होत आहेत.
अंधश्रद्धेसंदर्भातली जनजागृती करताना सद्गुरू आणि भोंदूबाबा यांच्यातील भेद स्पष्ट करणारा प्रबोधनात्मक असा चलचित्र देखावा चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने उभारला आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून आई, वडील त्यानंतर शिक्षकांच्या रूपाने माणसाला गुरू लाभतात. तर आध्यात्मिक मार्गावरून जात असताना सद्गुरूंची भेट होते. पण काही लोक झटपट श्रीमंत होण्याच्या नादात भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकतात. काही ठिकाणी पैशांचा पाऊस पाडला जातो तर काही ठिकाणी चिमुरडय़ांचा जीव दिला जातो. त्यामुळे भोंदूबाबांच्या भूलथापांना बळी पडता कामा नये, असा संदेश देखाव्यांच्या माध्यमातून मंडळाने दिला आहे.
चांदिवलीतील स्थानिक नगरसेवक ईश्वर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली कला दिग्दर्शक विकास शिंदे यांच्या संकल्पनेतून चलचित्र देखावा साकारला आहे. सध्या मंडळाचे सुनील लाड, सुरेश जाधव, रामकृष्णन, अशोक काचळे, संजय नलावडे, संतोष रासम, सुहास शेटय़े, धर्मन रावत, रवींद्र नेवरेकर, प्रमोल हुले हे कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सामाजिक संदेश देण्याची परंपरा चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे. (प्रतिनिधी)