गणपती सजावट, मखर यंदा घरच्या घरीच साकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 01:53 AM2020-08-22T01:53:13+5:302020-08-22T01:53:36+5:30

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक जण बाजारांमध्ये खरेदी करणे टाळत आहेत.

Ganpati decoration, Makhar made at home this year | गणपती सजावट, मखर यंदा घरच्या घरीच साकारली

गणपती सजावट, मखर यंदा घरच्या घरीच साकारली

Next

ओम्कार गावंड 
मुंबई : देशावर कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक जण बाजारांमध्ये खरेदी करणे टाळत आहेत.
दरवर्षी सजावटीच्या वस्तू, मखर, कंठ्या, मुकुट व हार या गोष्टींनी बाजार फुललेला असतो. मात्र यंदा ग्राहकांनी सजावटीच्या वस्तू आणि मखर खरेदीकडे पाठ फिरवली आहे. लोकांनी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये सजावट व मखर तयार केले आहेत. कंठी व हिरेजडित मुकुट साकारण्यासाठी लागणारे हिरे व मणी तसेच विविध वस्तूंची इतर राज्यांतून व देशांमधून आयात न झाल्याने अनेक कलाकारांना याचा फटका बसला आहे.
परळच्या म्हाडगुत परिवाराने यंदा बाप्पासाठी घरीच मखर व सजावट केली आहे. त्यांनी कोरोना विषयाशी निगडित एक सकारात्मक ऊर्जा देणारी सजावट साकारली आहे. गणेशोत्सवाची पहाट उजाडून गणरायांचे घरी आगमन झाले आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे आपण कोरोनावर मात करून एक विजयी रणशिंग फुंकले आहे. अशा संकल्पनेवर आधारित बाप्पाची सजावट साकारली असल्याचे शार्दुल म्हाडगुत यांनी सांगितले.
तर दुसरीकडे बाप्पाला कंठी, मुकुट व हिऱ्यांची सजावट करणारे कलाकार मनीष गावंड यांनी सांगितले की, कोरोनामुळे देशातील नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे.

Web Title: Ganpati decoration, Makhar made at home this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.