Join us

Ganpati Festival : पाच दिवसांच्या बाप्पांना जल्लोषात निरोप देण्यास सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 7:38 PM

८६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाच्या  मूर्तींचे   विसर्जन करण्यात आले. त्यापैकी १४ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. तर घरगुती ८८४० गणपती मूर्तींचे आणि ८४१ गौरींचे विसर्जन पार पडले आहे. त्यापैकी १५८३ बाप्पांच्या मूर्ती आणि १०८ गौरी यांचे कृत्रिम तलावात मोठ्या उत्साहात पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात विसर्जन करण्यात आले आहे. 

मुंबई - ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…’, या जयघोषात आणि ढोल - ताशांच्या गजरात आज पाच दिवसांच्या गणपतींना निरोप दिला जात आहे. यानिमित्ताने भाविकांच्या सुरक्षेसाठी पालिका आणि पोलिसांनी विसर्जनस्थळी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. याशिवाय गणपतीचं विसर्जन कृत्रित तलावात करण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ८६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाच्या  मूर्तींचे   विसर्जन करण्यात आले. त्यापैकी १४ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. तर घरगुती ८८४० गणपती मूर्तींचे आणि ८४१ गौरींचे विसर्जन पार पडले आहे. त्यापैकी १५८३ बाप्पांच्या मूर्ती आणि १०८ गौरी यांचे कृत्रिम तलावात मोठ्या उत्साहात पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात विसर्जन करण्यात आले आहे. 

दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं मोठ्या थाटात विसर्जनानंतर आता पाच दिवसांच्या गणपती आणि गौरींना निरोप दिला जात आहे. यामध्ये घरगुती गणपतींसह काही सार्वजनिक मंडळांचा समावेश आहे. दुपारनंतर या विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहते. यानिमित्ताने मुंबईतील गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, शिवाजी पार्क, मढ, आक्सा आणि मार्वे या समुद्र किनारी पोलिस आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे.  

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सवमहाराष्ट्र