Join us

आरे कॉलनीच्या तलावातच गणपती मुर्तींचे विसर्जन होऊ द्या; भाजपाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 7:32 PM

आरे च्या तलावात गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यास मनाई असल्याचे देण्यात आले होते आदेश

मुंबई: आरे वसाहतीतील तलावांमध्ये यावर्षी गणपती विसर्जनाला परवानगी मिळणार नाही, असे पत्र आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेस ‘वनशक्ती’ या संघटनेच्या आग्रहावरून पाठवले आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ बदलावा, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

आरे वसाहतीच्या तलावांमध्ये गेले कित्येक वर्षांपासून गणपती विसर्जन केले जाते आणि त्यामुळे ‘वनशक्ती संघटना’ ही नेहमीच हिंदू समाजाच्या आणि विकासाच्या प्रश्नांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोपही आ. भातखळकरांनी या पत्राद्वारे केलेला आहे. ही बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी त्यांनी केली असून, जर का ही बंदी आरे प्रशासनाने उठवली नाही तर या विरोधामध्ये आंदोलन करावे लागेल असे ही आ. भातखळकर यांनी सांगितले आहे. कुठल्याही परिस्थिती मध्ये आरे कॉलनीच्या तलावातच यावर्षी सुद्धा परंपरा कायम राखत सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल हे सुद्धा त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

टॅग्स :गणेशोत्सव