गोरेगावात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:15 AM2017-07-31T01:15:49+5:302017-07-31T01:15:49+5:30

गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरात महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईत ५३ अनधिकृत दुकाने हटविण्यात आली.

gaoraegaavaata-anadhaikarta-baandhakaamaanvara-kaaravaai | गोरेगावात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

गोरेगावात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Next

मुंबई : गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरात महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईत ५३ अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. यामध्ये रस्त्यावरील ओटे, पायºया इत्यादी तोडण्यासह, दुकानांचे वाढीव बांधकाम, ताडपत्री, प्लॅस्टिकचे वाढीव छत इत्यादी बाबींचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले असून, ही कारवाई यापुढेही नियमितपणे चालू राहणार आहे, अशी माहिती ‘पी-दक्षिण’ विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांनी दिली.
गोरेगाव (पश्चिम) रेल्वे स्थानकालतच्या परिसरासह टोपीवाला मार्ग, बंडू मोरे मार्ग व ग्रामपंचायत मार्ग इत्यादी भागांतील एकूण ५३ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत.
या कारवाईमुळे नागरिकांना चालणे अधिक सुलभ होणार आहे. रस्त्यावरची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. कारवाई करण्यासाठी महापालिकेचे ४० कामगार-कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. कारवाईसाठी १ जेसीबी, १ लॉरी, १ डम्पर, गॅस कटर व अतिक्रमण निर्मूलन वाहन वापरण्यात आले.

Web Title: gaoraegaavaata-anadhaikarta-baandhakaamaanvara-kaaravaai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.