Join us

उड़ी उड़ी जाए...चौघडा तारा, ढोलीडा...; गरबा आला रंगात, तरुणाई थिरकली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 1:26 PM

सध्या गरबा रसिकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डिस्को जॉकीच्या तालावर मुंबापुरीतला गरबा रंगू लागला असून, रविवारासह सोमवारी यात आणखी भर पडणार आहे. विशेष म्हणजे शेवटच्या दोन ते दिवसांसाठी गरबा रंगविणारे डिस्को जॉकी सध्या ऑन डिमांड असून, वेगवेगळ्या गाण्यांना गरब्याच्या तालावर मिक्स करणारे जॉकी सध्या गरबा रसिकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.

नवरात्र उत्सव सुरु झाल्यापासून ऑर्केस्ट, डिजेची मागणी वाढली आहे. नऊ दिवस गाणी वाजविण्यासाठी डिजेला कमीत कमी ३० हजार मिळत आहेत. तर घाटकोपरासह कांदिवलीसारख्या परिसरात हाच आकडा दोन लाखांच्या घरात आहे. साऊंड सिस्टीमची मागणीदेखील वाढली असून, साऊंड सिस्टीमकडून नऊ दिवसांसाठी २ लाख रुपये आकारले जात आहेत. शिवाय तिकिट आकारल्या गरब्यांचे कार्यक्रम आणखी भाव खाऊन जात असून, त्याला इव्हेंटचे स्वरुप आले आहे. या तिकिटांची किंमत एका हजारापासून सुरु होत असून, २५ हजार रुपयांपर्यंत आहे.

गरब्यासाठी गायकांची मागणीही वाढली असून, ड्रमरदेखील भाव खाऊन जात आहे. डिस्को लाइट इंडस्ट्री, साऊंड अँड लाऊट इंडस्ट्री असे सगळेच नवरात्र उत्सवात जोरात आहे. मुंबईतल्या बहुतांश मंडळांत रविवारी होम हवनचे आयोजन करण्यात आले आहे.दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईत काळाचौकीपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरात घाटकोपर, मुलुंडसह मालाड व कांदिवली परिसरात गरब्याने रंग भरला आहे. रात्री १० वाजेपर्यंत असणारी वेळ रविवारी व सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत असल्याने गरबारसिकांमध्ये उत्साह आहे.

मला आवड असल्याने  मी स्वत: डिस्को जॉकीचे काम शिकलो आहे. दोन महिन्यांत ही कला अवगत केली आहे. तेरा वर्षांहून अधिक काळ मी हे काम करत आहे. देशात कार्यक्रम केले, पण नवरात्रौत्सवात काम करण्याचा आनंद वेगळा आहे. या कामाचे समाधान आहे. - डी.जे. राहुल.

 

टॅग्स :नवरात्री