Join us

कचराकुंड्या हद्दपार होणार

By admin | Published: February 10, 2016 1:12 AM

नाक्या-नाक्यावर भरून वाहणाऱ्या कचराकुंड्या मुंबईच्या स्वच्छतेचे तीनतेरा वाजवत आहेत़ हे चित्र बदलण्यासाठी पालिकेने घरोघरी व सोसायटीमध्ये जाऊन कचरा गोळा करण्याचा निर्णय

मुंबई : नाक्या-नाक्यावर भरून वाहणाऱ्या कचराकुंड्या मुंबईच्या स्वच्छतेचे तीनतेरा वाजवत आहेत़ हे चित्र बदलण्यासाठी पालिकेने घरोघरी व सोसायटीमध्ये जाऊन कचरा गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे़ तत्पूर्वी नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेण्यासाठी मुलुंडच्या टी विभागात या मोहिमेचा प्रयोग करण्यात येत आहे़मुंबईत आजच्या घडीला नाक्या-नाक्यावर बसविण्यात आलेल्या कचराकुंडीतून पालिकेची गाडी कचरा उचलून नेते़ अशा कचराकुंड्यांमध्ये कचरा भरून वाहत असल्याने, मुंबईचीच कचराकुंडी झाली आहे़ हे चित्र पालटण्यासाठी मुलुंडमध्ये खुली कचराकुंडीमुक्त परिसर मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेंतर्गत २५ ठिकाणे कचराकुंडीमुक्त करण्यात आली आहेत़ त्यानुसार प्रभाग क्ऱ १०३ मधून १९ व इतर प्रभागातील सहा ठिकाणच्या खुल्या कचराकुंड्या बंद करण्यात आल्या़ या प्रयोगाला सुरुवातीला स्थानिकांकडून विरोध झाला़ मात्र, पालिकेने घराघरातून व प्रत्येक सोसायटीमधून कचरा गोळा करण्यास सुरुवात केली़ त्यानुसार पालिकेची कचरावाहक गाडी दररोज प्रत्येक सोसायटी व घरापुढे जाऊन कचरा गोळा करीत आहे़ या वेळेत नागरिकांनी या वाहनापर्यंत कचरा आणून देणे अपेक्षित आहे़ ही मोहीम यशस्वी ठरल्यास, संपूर्ण मुंबईत याची अंमलबजावणी होणार आहे़ (प्रतिनिधी)आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरएसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विभाग कार्यालयाकडे नागरिक आपली तक्रार करू शकतात़मुलुंडची लोकसंख्या ५८ हजार ६८९ आहे, तसेच ३८५ सोसायट्या, १६३५ व्यवसायिक आस्थापना आहेत़ या प्रभागातून दररोज सरासरी २४ मे़ टन कचरा तयार होतो़प्रत्येक परिसरात दोन वेळा पालिकेची कचऱ्याची गाडी फिरते़ यामध्ये सोसायटीने कचरा आणून टाकणे अपेक्षित आहे़ ४० सोसायट्यांमध्ये कचऱ्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यासाठी खड्डे तयार केले आहेत़कचरा ४८ तासांत उचलला न गेल्यास नागरिक छायाचित्र काढून व्हॉट्सअ‍ॅपवर टाकू शकतात़ १२ तासांमध्ये याची दखल घेतली जाईल़ कारवाई झाल्यानंतर याबाबत संबंधित तक्रारदाराला कळविण्यात येते़ BMC T ward Grievance Redressal या अ‍ॅपवर तक्रार करता येईल़, तसेच ९९७०००१३१२ या क्रमांकावर तक्रार करु शकतात़