अनेक शहरांत कचराकोंडी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:33 AM2019-02-04T07:33:26+5:302019-02-04T07:33:42+5:30

घनकचरा प्रक्रिया प्रकल्प मार्गी न लागल्याने राज्यातील जवळपास प्रत्येक शहरात कचऱ्याचे डोंगर तयार झाले असून, त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Garbage in many cities; Civil health risks | अनेक शहरांत कचराकोंडी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अनेक शहरांत कचराकोंडी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next

- सचिन लुंगसे
मुंबई : घनकचरा प्रक्रिया प्रकल्प मार्गी न लागल्याने राज्यातील जवळपास प्रत्येक शहरात कचऱ्याचे डोंगर तयार झाले असून, त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढत्या कचºयामुळे आरोग्य, पर्यावरण आणि प्रदूषणाचे प्रश्नही वाढू लागले आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हे प्रकल्प उभारले जाणार होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात दररोज २२ हजार ८९७.८३ मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून, त्यापैकी अवघ्या सात हजार ९४५.५४४ मेट्रिकटन कचºयावरच पुनर्प्रक्रिया होते.
मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यासारख्या काही शहरांत घनकचºयावर पुनर्प्रक्रियेवर भर दिला जात असला, तरी परभणी, अहमदनगर, मालेगाव, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, सांगली, अकोला, जालना, लातूर, धुळे, अमरावती येथे मात्र घनकचºयाची परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण, त्यावरून शहरांचा ठरणारा दर्जा, या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून, यामुळे परिस्थिती सुधारत असल्याचा दावा मंडळातर्फे करण्यात आला (पान १0 वर)

कचरानिर्मितीतही महाराष्ट्र अग्रस्थानी

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २०१७ साली ८१.०८ लाख मेट्रिक टन, तर २०१६ साली ८०.११ लाख मेट्रिक टन कचरा गोळा झाला होता. देशातील हा सर्वाधिक आकडा होता. ५ सप्टेंबर, २०१८ ला राज्यातील ३२ महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या १७८ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखड्याला राज्य सरकारने उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता दिली होती.

Web Title: Garbage in many cities; Civil health risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.