मुंबई : हाजीअली समुद्रकिनाऱ्याजवळ साचलेल्या कच-याच्या ढिगाने मंगळवारी दुपारी अचानक पेट घेतला. या आगीमुळे किनाºयाशेजारील द्रुतगती मार्गावर धुराचे लोट उठले होते. त्यामुळे किनाºयावर बसणाºया पर्यटकांसह द्रुतगती मार्गावरून जाणाºया वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागले.या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन केंद्राने सांगितले. ताडदेव पोलिसांनी तत्काळ आगीच्या ठिकाणी धाव घेत, अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. साचलेले प्लॅस्टिक आणि कपड्याच्या कचºयामुळे ही आग पसरली होती. सुरुवातीला महालक्ष्मी रेस कोर्स मैदानासमोरील चौपाटीला असलेली आग वाºयामुळे गरवारे सभागृहासमोरील चौपाटीपर्यंत पोहोचली. जळणाºया कचºयाचा धूर या लगतच्या इमारतींमध्ये शिरल्याने स्थानिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. या ठिकाणी महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवून कचºयाचा ढीग स्वच्छ करण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे.
हाजीअली किनारपट्टीजवळील कचरा पेटला, धुराचा स्थानिकांना त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 6:02 AM