गोरेगाव : माणगाव तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणा-या नागरी परिसरात ठिकठिकाणी कचरा साठलेला दिसत आहे. चिंचवली मधील मुकुंद नगर, विंचवली वाडी, सुयोग नगर परिसरात कच-यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चिंचवली ग्रामपंचायतीला ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वछ गाव म्हणून गौरवले गेले आहे. सद्ययिस्थतीत ग्रामपंचायतीचे उत्पन्न चांगले आहे. ग्रामपंचायतीकडे एक घंटागाडी आहे. मात्र ती देखील नादुरु स्त स्थितीत आहे. मग कचरा उचलणार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.याबाबतीत अयोध्या नगर येथील सामाजिक कार्यकर्ते लिमजे यांनी वारंवार ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना विचारले मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. असे लिमजे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीकडे कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही, पंचायतीचे जास्त उत्पन्न नाही शिवाय कामगारांसाठी पैशांची तरतूद नाही अशी वेळकाढूपणाची उत्तरे नागरिकांना देण्यात येतात. कचर्यामुळे शहराचे सौंदर्य बकाल दिसत आहे. कचरा प्रश्न त्वरीत सोडवावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. गेले दहा दिवस घंटागाडीचे सुटे भाग मिळत नसल्याने गाडी नादुरु स्त स्थितीत आहे. सुटे भाग मिळाले की गाडी सुरु करून कचरा प्रश्न सोडवू, असे आश्वासन चिंचवलीचे सरपंच कृष्ण तटकरे यांनी सांगितले. (वार्ताहर)
चिंचवलीमध्ये कचराच कचरा
By admin | Published: May 26, 2014 4:35 AM