ग्लास हाऊसच्या जागी होणार उद्यान व योगा सेंटर
By admin | Published: May 22, 2015 10:56 PM2015-05-22T22:56:24+5:302015-05-22T22:56:24+5:30
सेक्टर १५ येथील ग्लास हाऊसच्या जागी उद्याने, बोटिंग तसेच योगा सेंटर बांधले जावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली होती.
नवी मुंबई : सेक्टर १५ येथील ग्लास हाऊसच्या जागी उद्याने, बोटिंग तसेच योगा सेंटर बांधले जावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली होती. या मागणी संदर्भात त्यांनी अनेक वेळा सिडको आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. या प्रकल्पाबाबत आता सिडको आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने हिरवा कंदील दिल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईकरांना आधुनिक सोयी - सुविधा मिळाव्यात, रिकाम्या जागेचा पुरेपूर वापर करून त्या ठिकाणी उद्याने, व्यायामशाळा बांधावी, अशी मागणी मंदा म्हात्रे केली होती. याबाबत त्यांनी सिडको आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांच्याशी पत्रव्यवहार करून निवेदन सादर केले होते. या प्रकल्पाबाबत सिडको आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने मंजुरी दिली असून या जागी लवकरच उद्याने, बोटिंग आणि योगा सेंटरची स्थापना होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सुविधायुक्त उद्यान प्राप्त करून दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.