नवचैतन्यासाठी उद्याने सज्ज; खास मुंबईकरांच्या स्वागतासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:47 AM2020-08-14T01:47:17+5:302020-08-14T01:47:22+5:30

महापालिकेची सुरू आहे तयारी

Gardens ready for rejuvenation; Special welcome to Mumbaikars | नवचैतन्यासाठी उद्याने सज्ज; खास मुंबईकरांच्या स्वागतासाठी

नवचैतन्यासाठी उद्याने सज्ज; खास मुंबईकरांच्या स्वागतासाठी

Next

मुंबई : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या भीतीमुळे गेले चार महिने घरातच बंदिस्त झालेले मुंबईकर आता हळूहळू घराबाहेर पडू लागले आहेत. आर्थिक अस्थिरता आणि अस्वस्थतेची मरगळ झटकून सकाळच्या प्रभातफेरीसाठी अनेक पावले उद्यानांच्या दिशेने वळत आहेत. अशा असंख्य मुंबईकरांना दोन क्षण विरंगुळ्याचे देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्याकरिता मुंबईतील उद्याने सज्ज झाली आहेत.

धकाधकीच्या जीवनात मोकळा श्वास घेण्यासाठी लाखो मुंबईकर सार्वजनिक उद्यानांमध्ये फेरफटका मारत असतात. तर एखाद्या कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पागोष्टी रंगत असतात. कार्यालयातील टेन्शन, घरच्या कटकटी उद्यानातील प्रसन्न वातावरणात विरघळून जात असतात. मात्र मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मॉल, चित्रपटगृह, धार्मिक स्थळ याप्रमाणेच उद्यानांच्या प्रवेशद्वारालाही टाळे लागले. या काळात बऱ्याच उद्यानांमध्ये गवत वाढले, सोसाट्याच्या वाºयाने झाडे कोसळली, तर कुठे पायवाट चिखलाने माखली.

तणावातून मुक्तता
लॉकडाऊनच्या काळात उद्याने बंद असली तरी त्यांची नियमित देखभाल केली जात होती. सर्वच उद्याने आता खुली झाली असून त्यांची दररोज निगा राखली जात आहे. मुंबईकर विरंगुळा करण्यासाठी उद्यानात जात आहेत़ त्यांचे मन प्रसन्न करण्यासाठी कोरोनाच्या तणावातून मुक्तता करण्यासाठी उद्यानात खास काळजी घेतली जात आहे़

लॉकडाऊनच्या काळात उद्याने बंद असली तरी त्यांची नियमित देखभाल केली जात होती. सर्वच उद्याने आता खुली झाली असून त्यांची दररोज निगा राखली जात आहे.
- जितेंद्र परदेशी,
उद्यान अधीक्षक, महापालिका

लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले करण्यात येत असल्याने गेल्या महिन्यात उद्यानांची द्वारे उघडली आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून आता काही महिन्यांनंतर अनेक सवंगडी एकमेकांना भेटून आपले दु:ख हलके करणार आहेत.
मुसळधार पावसामुळे उद्यानातील हिरवळही त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी बहरली आहे. त्यामुळे मुंबईतील उद्यानांची सफाई सध्या प्राधान्याने सुरू करण्यात आली आहे.
कुठे पायवाटेवरील माती साफ केली जात आहे, तर कुठे वाढलेल्या झाडांची गरजेनुसार छाटणी सुरू आहे. काही ठिकाणी उद्यानात झाडे कोसळल्याने ती उचलून तो परिसर साफ करण्याचे काम सुरू आहे.
भायखळा, हॉर्निमन सर्कल उद्यान, छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळील उद्यान येथे अशी कामे होताना दिसून येत आहेत.

Web Title: Gardens ready for rejuvenation; Special welcome to Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.