Join us

मुलुंडच्या म्हाडा कॉलनीतील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या खोलीत गर्दुल्ल्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:06 AM

मुंबई : मुलुंड पूर्व येथील म्हाडा कॉलनीमध्ये असणाऱ्या महावितरणच्या यशोधन ट्रान्सफॉर्मरची खोली गर्दुल्यांच्या अड्डा बनली आहे. म्हाडा कॉलनीतील उद्यानात ...

मुंबई : मुलुंड पूर्व येथील म्हाडा कॉलनीमध्ये असणाऱ्या महावितरणच्या यशोधन ट्रान्सफॉर्मरची खोली गर्दुल्यांच्या अड्डा बनली आहे. म्हाडा कॉलनीतील उद्यानात हा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. येथून म्हाडा कॉलनीला वीजपुरवठा होतो. परंतु या ट्रान्सफॉर्मर खोलीचा दरवाजा उघडा असल्याने या खोलीच्या आत दारूडे, गर्दुल्ले तसेच प्रेमी जोडपे बसतात. ट्रान्सफॉर्मरमधून हाय व्होल्टेज वीजपुरवठा होत असल्याने ट्रान्सफॉर्मरजवळ जाणेदेखील अत्यंत धोकादायक आहे. मात्र येथे रात्रीच्या वेळेस सर्रासपणे गैरप्रकार केले जातात. येथे आजूबाजूला लोकवस्ती असल्याने ट्रान्सफॉर्मरच्या येथून जाताना नागरिकांना असुरक्षिततेची भावना निर्माण होते. या ट्रान्सफॉर्मरच्या बाजूलाच उद्यान असल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचादेखील येथे प्रश्न उपस्थित होत आहे. यासंबंधी म्हाडा कॉलनी असोसिएशनच्या वतीने महावितरण तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मात्र याविषयी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या ट्रान्सफॉर्मरच्या खोलीच्या दरवाजाला टाळे लावून उघड्या खिडक्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी म्हाडा कॉलनीतील रहिवाशांतर्फे करण्यात येत आहे.