बोरीवली स्थानकामध्ये गर्दुल्ल्यांनी मांडला उच्छाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 11:06 AM2023-09-03T11:06:29+5:302023-09-03T11:06:57+5:30

स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असताना स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचा वावरही वाढला आहे. 

Gardullas staged Uchchad in Borivali station | बोरीवली स्थानकामध्ये गर्दुल्ल्यांनी मांडला उच्छाद

बोरीवली स्थानकामध्ये गर्दुल्ल्यांनी मांडला उच्छाद

googlenewsNext

मुंबई: सुरक्षित, स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेला प्रवाशांची पसंती असते. वाहतूककोंडीत अडकण्याची भीती नाही,  रस्तेमार्गापेक्षा लवकर पोहोचता येते. अशा विविध कारणांमुळे दररोज हजारो प्रवासी रेल्वेचा आधार घेतात. मात्र, या प्रवाशांना स्थानकावर किमान काही चांगल्या सुविधा मिळाव्यात, असे प्रशासनाला वाटत नाही. रेल्वे पोलिस आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे  बोरीवली स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांनी उच्छाद मांडला आहे. स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असताना स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचा वावरही वाढला आहे. 

गर्दुल्ल्यांची संख्या वाढते 
  गुर्दुल्ले  दिवसरात्र स्थानक परिसरात पडलेलेच असतात. 
  त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे. 
  रात्री १० नंतर गर्दुल्ल्यांची संख्या वाढते. दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. 
  प्रवासी दिसला की भिकारी त्याच्या मागे पैसे घेण्यासाठी फिरतात.

रेल्वेस्थानकात गर्दुल्ले असतील तर रेल्वे प्रवाशांचा सुरक्षित प्रवास कसा होणार? आरपीएफ आणि जीआरपीने तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे. 
- सदानंद पावगी, उपाध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ

Web Title: Gardullas staged Uchchad in Borivali station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.