लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना सकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी घडली. या घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ६ वाजून ४० मिनिटांपर्यंत अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
वांद्रे येथील गझबंद रोडवरील फिटर गल्ली मध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आगीची ही घटना घडली. दरम्यान तिथे असलेले कपडे , इलेकट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इंस्टोलेशन यामुळे आग पसरली. आगीची माहिती मिळताच दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.भाभा रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ पूर्वा यांनी दिलेली जखमींची माहिती
१) निखिल दास - वय ५३ वर्षे - ३५ टक्के भाजले आहेत२) राकेश शर्मा - वय ३८ वर्षे - ४० टक्के भाजले आहेत३) अँथोनी थेंगल - ६५ वर्षे - ४० टक्के भाजले आहेत४) कालीचरण कनोजिया - ५४ वर्षे - २५ टक्के भाजले आहेत५) शाह अली सिद्दीकी - ३१ वर्षे - ४० टक्के भाजले आहेत६) समशेर - ५० वर्षे - चेहऱ्याला भाजले असून सर्जिकल वार्डमध्ये दाखल७) संगीता - ३२ वर्षे - किरकोळ भाजल्याने ओर्थ्रो वॉर्डमध्ये दाखल८) सीता -४५ वर्षे - रुग्णालयात दाखल होण्यास नकार