लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी घडली. या घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळी ६ वाजून ४० मिनिटांपर्यंत अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
वांद्रे येथील गझबंद रोडवरील फिटर गल्लीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आगीची ही घटना घडली. दरम्यान, तिथे असलेले कपडे इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टोलेशन यामुळे आग पसरली. आगीची माहिती मिळताच दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांची नावेनिखिल दास (वय ५३), राकेश शर्मा (वय ३८), अँथोनी थेंगल (वय ६५), कालीचरण कनोजिया (वय ५४), शाह अली सिद्दिकी (वय ३१), समशेर (वय ५०), संगीता (वय ३२), सीता (वय ४५).