Join us  

मालाडला गॅसची गळती

By admin | Published: March 30, 2017 7:20 AM

मालाड परिसरात बुधवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. या ठिकाणी पश्चिम द्रुतगती महामार्गावर महानगर

मुंबई : मालाड परिसरात बुधवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. या ठिकाणी पश्चिम द्रुतगती महामार्गावर महानगर गॅसची पाइपलाइन फुटल्यामुळे हा प्रकार घडला. अग्निशमन दल आणि दिंडोशी पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.एमएमआरडीएमार्फत मेट्रोचे खोदकाम मालाडच्या पुष्पापार्क परिसरात असलेल्या टाइम्स आॅफ इंडिया फ्लायओव्हरजवळ सुरूआहे. या ठिकाणी दुपारी १च्या सुमारास अचानक महानगर पाइपमधून गॅसगळती होऊ लागली. या प्रकरणी दिंडोशी पोलीस, अग्निशमन दल, स्थानिक बोर्ड आणि महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. संध्याकाळी जवळपास साडे सहापर्यंत अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी कार्यरत होते. याच कारणास्तव फ्लायओव्हरवरील वाहतूक रस्त्यावर वळविण्यात आली. ज्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांना जवळपास १२ तास सीएनजी उपलब्ध होणार नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वाहतुकीची कोंडी त्यातच तापमानात प्रचंड वाढ झाल्याने कित्येक तास वाहनचालकांना रस्त्यावर रखडावे लागले. वाहतूक नियंत्रण करताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. रात्री उशिरापर्यंत महानगर पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम चालणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)