दहिसरमधील गॅस लाईनला पुन्हा कंत्राटदाराने दिली धडक; गॅस पुरवठा पुन्हा झाला खंडित

By मनोहर कुंभेजकर | Published: December 12, 2023 08:29 PM2023-12-12T20:29:00+5:302023-12-12T20:29:18+5:30

हजारो नागरिकांचे हाल

Gas line in Dahisar again hit by contractor; Gas supply was interrupted again mumbai news | दहिसरमधील गॅस लाईनला पुन्हा कंत्राटदाराने दिली धडक; गॅस पुरवठा पुन्हा झाला खंडित

दहिसरमधील गॅस लाईनला पुन्हा कंत्राटदाराने दिली धडक; गॅस पुरवठा पुन्हा झाला खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसर पूर्व येथील जरीमरी गार्डन आनंद नगर येथे आज सायंकाळी 7 वाजता रस्त्याचे काम सुरू असताना पालिकेच्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे पुन्हा येथील गॅस वाहिनीला धक्का लागला. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील गॅस पुरवठा बंद करावा लागला असून आज पहाटे दोनच्या सुमारास येथील गॅस पुरवठा पुन्हा सुरळीत होईल असे  महानगर गॅसने येथील नागरिकांना मेसेज करून कळवले आहे, अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश पंड्या
यांनी लोकमतला दिली.

येथे गॅस गळती सुरू झाल्याचे कळताच फायर ब्रिगेड आणि महानगर गॅसने  घटनास्थळी धाव घेतली आणि येथील गॅस पुरवठा खंडित केला त्यामुळे मोठी दुर्घटना टळली अशी माहिती त्यांनी दिली.

दहिसर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज लिंक रोड, सीएएमटी रोड क्रमांक ३ आणि ५, आनंद नगर, शक्तीनगर, अवधूत नगर आदी विविध भागातील १०० हून अधिक इमारतींचा गॅस पुरवठा ऐन संध्याकाळी खंडित झाल्यामुळे रहिवाशांच्या घरची चूलच बंद झाली.परिणामी आज आम्हाला हॉटेल मधून जेवण मागवावे लागेल अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.

गेल्या शुक्रवार दि,8 रोजी दुपारी महानगर गॅसच्या वाहिनीला गळती सुरू झाली. रस्त्याचे काम सुरू असताना पालिकेच्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे या येथील गॅस वाहिनीला धक्का लागून गॅस वाहिनीचे नुकसान झाले. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील गॅस पुरवठा  बंद करावा लागला होता.

आज परत येथे सदर दुर्घटना घडल्याने दहिसर पोलिसांनी जेसीबीने रस्ता खोदणाऱ्या आणि गॅस पाईपलाईनला धडक देणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर एफआयआर दाखल करावा आणि त्याच्यावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकून पालिकेने दंड वसूल करावा.अश्या घटना परत परत घडणार नाही याची काळजी घ्यावी.

- राजेश पंड्या, सामाजिक कार्यकर्ते

याठिकाणी रस्त्याचे काम सुरू असतांना कंत्राटदाराकडून परतगॅस पाईपलाईनला धक्का लागून परिणामी गॅस गळती झाली होती.याप्रकरणी दहिसर पोलिसांनी संबंधित कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकाला चौकशी साठी दहिसर पोलिस ठाण्यात घेवून गेले आहेत.

नवनिश वेंगुर्लेकर
सहाय्यक आयुक्त
आर उत्तर विभाग

Web Title: Gas line in Dahisar again hit by contractor; Gas supply was interrupted again mumbai news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई