गॅसचे अनुदान होईल बंद; तुम्ही ई-केवायसी केली का? शहरामध्ये उज्ज्वला योजनेची जनजागृती सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:50 AM2024-01-05T10:50:24+5:302024-01-05T10:51:30+5:30

मुंबई शहरामध्ये उज्ज्वला योजनेची जनजागृती सुरू आहे.

Gas subsidy will stop have you done e kyc in cities government started public awareness ujjwalaa yojana | गॅसचे अनुदान होईल बंद; तुम्ही ई-केवायसी केली का? शहरामध्ये उज्ज्वला योजनेची जनजागृती सुरू 

गॅसचे अनुदान होईल बंद; तुम्ही ई-केवायसी केली का? शहरामध्ये उज्ज्वला योजनेची जनजागृती सुरू 

मुंबई :मुंबई शहरामध्ये उज्ज्वला योजनेची जनजागृती सुरू आहे. पात्रतेचे निकष बसत नसल्यामुळे काहींचे अर्ज शिल्लक आहेत. अशातच ई केवायसी बंधनकारक करण्यात आल्यामुळे कायमचे गॅस अनुदान बंद होण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात एचपी गॅस आणि भारत गॅस एजन्सीकडून स्वयंपाकाचा गॅस वितरित केला जातो. याकडे जवळपास सातशे लोकांनी अर्ज केले आहेत.मुंबईसारख्या शहरांमध्येही उत्पन्नाची मर्यादा आहे. त्यामुळे अर्जाचे निकष पूर्ण करणाऱ्या नागरिकांना त्याचा लाभ दिला जात नाही. परिणामी लाभार्थी कमी आहेत.

‘उज्ज्वला’चे अनुदान किती? 

केंद्र सरकारने उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलिंडर अनुदानाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रती एलपीजी सिलिंडर २०० रुपये अनुदान एक वर्षासाठी वाढवला आहे. हे अनुदान १४.२ किलोच्या १२ एलपीजी सिलिंडरवर देण्यात येणार आहे. त्याचा फायदा १.६  कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.
 
कशी करावी ई-केवायसी? 

गॅस सिलिंडर खरेदी केला असेल तेथे जावे लागेल. तेथे गेल्यानंतर अंगठ्याने बायोमेट्रिक ई-केवायसी केले जाईल. ई-केवायसी करताना नाव आणि सर्व कागदपत्रे आधार कार्डशी जुळतील. तुमचे ई-केवायसी झाल्यानंतर, तुम्हाला दरमहा सबसिडीचा लाभ मिळू शकेल.

 पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करणाऱ्या महिलांना सबसिडी मिळविण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  कोणत्याही परिस्थितीत त्यांना ई-केवायसी करावे लागेल तरच त्यांना सबसिडी. 

३१ डिसेंबरपर्यंत होती मुदत-

सरकारकडून ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला लाभ नाही असे जाहीर करण्यात आले होते.

Web Title: Gas subsidy will stop have you done e kyc in cities government started public awareness ujjwalaa yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई