मीरा रोड : भार्इंदर पूर्वेच्या आझादनगर झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. तीन दिवसांत १०० पेक्षा अधिक नागरिकांना उलटी, जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, विविध रुग्णालयांत ४३ रु ग्ण दाखल आहेत, तर सर्वेक्षणात ६४ रु ग्ण आढळले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने गॅस्ट्रोचे रु ग्ण आढळूनही लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने अद्याप प्रभावी उपाययोजना केलेली नाही. पालिकेचा दूषित पाणीपुरवठा व टँकरच्या पाण्यामुळे लागण झाल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे. आझादनगरमधील गल्ली क्र मांक २ ते ४ मध्ये १ एप्रिलपासून नागरिकांना उलट्या, जुलाब याचा त्रास सुरू झाला आहे. ३ नंबर गल्लीत राहणारा साकीरअली राईल (२५) याला पहिल्यांदा उलट्या व जुलाब होऊ लागल्याने जवळच्या तनवर रु ग्णालयात दाखल केले. राईलपाठोपाठ परिसरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. पालिकेची आकडेवारी विचारात घेतली तर पालिकेच्या जोशी रु ग्णालयात ११, तनवरमध्ये १०, जुगरामध्ये ९, शिवममध्ये ८, तुंगामध्ये १, तर शाह लाइफलाइनमध्ये ४ असे ४३ जण दाखल आहेत. तर, रविवारी रात्री पालिका अधिकाऱ्यांना आझादनगरमध्ये गॅस्ट्रोची लागण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सोमवारी सकाळी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चकोर यांनी आझादनगरमध्ये तपासणी मोहीम घेतली असता १०७ रु ग्णांपैकी तब्बल ६४ जणांना जुलाबाची लागण झाल्याचे आढळले. शिवाय, ३० जणांना सर्दी-खोकला, ८ जणांना ताप, तर ५ जणांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. खाजगी दवाखाने व रुग्णालयांत दाखल असलेल्या रु ग्णांची शक्यता लक्षात घेता ही संख्या दीडशेपेक्षा जास्त असल्याचे समजते. अब्दुल रेहमान (१६) याला भक्तिवेदान्तमध्ये नेले होते. तेथे २५ हजार भरण्यास सांगितल्याने पालिकेच्या भीमसेन जोशी रु ग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु, उपचाराची पुरेशी सोय नसल्याने त्याला कांदिवलीच्या शताब्दी रु ग्णालयात नेण्याचा सल्ला पालिका रु ग्णालयातून देण्यात आला. जुगरा रुग्णालयात शनिवारपासून दाखल असलेला फिरंगीलाल यादव (४०) हा तर बेशुद्धच पडला होता. तर शहीद खान, इर्शाद अन्सारी, रघुवीर गुप्ता यांना रविवारी उलट्या, जुलाब मोठ्या प्रमाणात होऊ लागताच दाखल करण्यात आले.
भार्इंदरमध्ये गॅस्ट्रो
By admin | Published: April 05, 2016 1:24 AM