मुंबईकरांना गॅस्ट्रोचा धोका
By admin | Published: July 12, 2016 03:11 AM2016-07-12T03:11:44+5:302016-07-12T03:11:44+5:30
पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत हळूहळू साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण अद्याप वाढलेले नसले
मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत हळूहळू साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण अद्याप वाढलेले नसले तरी दूषित पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रोची साथ मुंबईत पसरली आहे. १० जुलै रोजी एका दिवसात गॅस्ट्रोची लागण झालेल्या ८४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर उघड्यावरचे अन्नपदार्थ, पाणी प्यायल्याने कावीळ, गॅस्ट्रो आणि डायरियाची लागण होण्याचा धोका असतो. या आजारांना रोखणे सहज शक्य आहे. दूषित अन्नपदार्थ आणि पाणी पिणे टाळल्यास या आजारांना आळा घालता येऊ शकतो. याविषयी महापालिका जनजागृती करत आहे. मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
मलेरिया आणि डेंग्यूचे १६ रुग्ण आढळून आले आहेत. तर, टायफॉईडचे ९ आणि हॅपिटायटिसचे (ए,ई) १२ रुग्ण आढळून आले आहेत.