तरुणाईच्या ‘किकी’विरुद्ध पोलिसांचे ‘गेट इन टू द कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:26 AM2018-08-08T05:26:50+5:302018-08-08T05:27:03+5:30

धावत्या चारचाकीतून उतरून रस्त्यावर डान्स करण्याचा जीवघेणा किकी चॅलेंज सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Gate in the to the car against the youth of Kiki | तरुणाईच्या ‘किकी’विरुद्ध पोलिसांचे ‘गेट इन टू द कार’

तरुणाईच्या ‘किकी’विरुद्ध पोलिसांचे ‘गेट इन टू द कार’

Next

मुंबई : धावत्या चारचाकीतून उतरून रस्त्यावर डान्स करण्याचा जीवघेणा किकी चॅलेंज सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळेच तरुणाईच्या ‘#किकी चॅलेंजला’ मुंबई पोलिसांनी ‘#गेट इन टू दि कार’ या हॅशटॅगने उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून, यामुळे टिष्ट्वटरवर सध्या तरुणाई आणि मुंबई पोलिसांमध्ये हॅशटॅग
वॉर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
अल्पावधीत तरुणाईला भुरळ घातलेल्या किकी चॅलेंजचे अनेक हॅशटॅग समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. यात #किकी चॅलेंज इंडिया, #माय किकी चॅलेंज, #रिअल किकी चॅलेंज असे हॅशटॅग नेटिझन्सकडून वापरले जात आहे. धावत्या वाहनांतून उतरून नृत्य करण्याचे चॅलेंज स्वीकारणाऱ्या तरुणाईला मुंबई पोलिसांनी त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी #गेट इन टू दि कार हा हॅशटॅग वापरून जनजागृतीला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर, किकी चॅलेंज स्वीकारल्यास कोणत्या दुष्परिणामाला सामोरे जावे लागेल, याबाबतचा व्हिडीओ शेअर करताना #गेट इन टू
दि कार हा हॅशटॅग वापरला जात
आहे.
मुंबई पोलिसांच्या #गेट इन टू दि कार या हॅशटॅगला काही नेटिझन्सने चांगला प्रतिसाद दिला आहे. इंटरनेटवरील चॅलेंज स्वीकारून स्वत:सह अन्य नागरिकांचे जीव धोक्यात घालणे हे चुकीचे आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विविध पोस्टर, बॅनर टिष्ट्वट करत #गेट इन टू दि कार हॅशटॅगमध्ये ट्रेडिंगमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
>रस्त्यांवरील ‘किकी’ रेल्वे फलाटावर
रस्त्यांवरील किकी चॅलेंजचे लोण रेल्वे स्थानकातील फलाटावरदेखील आल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे धावत्या लोकलमधून किकी चॅलेंजनुसार नृत्य करत असलेल्या तरुणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या धर्तीवर जीव धोक्यात घालून चॅलेंज स्वीकारणाºया तरुणाचा रेल्वे सुरक्षा बलाकडून शोध सुरू आहे.
विशेष म्हणजे, रेल्वे स्थानकांवर धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणे हे स्टंट करण्यासारखे धोकादायक आहे. यामुळे लोकलमध्ये स्टंट करणे या आरोपाखाली तरुणांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाºयाने दिली.

Web Title: Gate in the to the car against the youth of Kiki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.