गेट परीक्षा ५ फेब्रुवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:24 AM2020-12-13T04:24:01+5:302020-12-13T04:24:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असेलेली ‘गेट’ परीक्षा यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. देशातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असेलेली ‘गेट’ परीक्षा यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. देशातील आयआयटी, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांच्या प्रतिनिधींच्या गेट २०२१ कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेट परीक्षा आयआयटी मुंबईतर्फे आयोजित करण्यात येते. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत परीक्षा रोज दोन सत्रांत घेण्याचे ठरविण्यात आले. या वर्षी दोन अतिरिक्त विषयांचा समावेश झाल्याने परीक्षा २७ विषयांसाठी होईल. एक विद्यार्थी एका अर्जावर दोन विषयांच्या परीक्षेला बसू शकतो.
अर्जदार विद्यार्थ्यांची संख्या पाहून भविष्यात सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही यावेळी ठरविण्यात आले. सध्या ही परीक्षा ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत पार पडेल. याबाबत अधिक माहितीसाठी https://gate.iitb.ac.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे.