ठाणे : सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून घोडबंदर किल्ल्याच्या परिसरातील सुमारे पाच एकर जागेवर सर्व सोयीसुविधायुक्त उद्यान उभारले जाणार आहे. यामुळे पर्यटक त्याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील.जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक सोमवारी पार पडली असता त्यात एकमताने हा ठराव घेण्यात आला. या उद्यानासाठी डीपीसीद्वारे एक कोटी तर ठाणे महापालिकेद्वारे सुमारे दीड कोटी रुपये खर्च होणार आहेत. या किल्ल्याची डागडुजी करणे आवश्यक असतानाही त्यासाठी पुरातन विभागासह वनखात्याचा अडथळा आहे. तत्पूर्वी या परिसरात महसूल खात्याची सुमारे पाच एकर जागा असून त्यावर या उद्यानाची निर्मिती करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी डीपीसीमध्ये सातत्याने लावून धरली असता या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला विश्वासात घेऊन त्याबाबतचा ठराव एकमताने मंजूर केला. (प्रतिनिधी)
घोडबंदर किल्ल्याला उद्यानाचा साज
By admin | Published: March 01, 2015 10:59 PM