गौराई माझ्या लाडाची; साधेपणाने साजरा होणार आगमन सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 02:08 AM2020-08-25T02:08:16+5:302020-08-25T13:10:14+5:30
शहर उपनगरात दरवर्षी लाडक्या गौराईचे आगमन मोठ्या थाटामाटात होते. महिलांच्या जिव्हाळ्याचा हा सण केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीतच साजरा होईल.
कोरोनाच्या सावटामुळे बाजारातही वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांना धाकधूक वाटत आहे. गौरीच्या साड्या खरेदी करण्यापासून ते मुखवटे, दागदागिने व विविध देखाव्यांसाठी लागणारे साहित्य व डेकोरेशनसाठी महिलांची बाजारात लगबग दिसून येते. मात्र, घरी कोणालाही बोलावता येणार नसल्याने बºयाच सखींनी साध्या पद्धतीने गौरी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. गौरीच्या आगमनादिवशीही पाच सुवासिनींना बोलावून गौरी बसविल्या जातात.
या वर्षी मात्र, कुटुंबापुरताच हा सण मर्यादित राहणार असल्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर केवळ सजावटीचे फोटो शेअर केले जाणार आहेत. अन्यथा दरवर्षी महिलांची व्हॉट्सअॅप ग्रुप व कॉल करून मैत्रिणी व नातेवाइकांना आमंत्रण देण्याची गडबड असते.
1)शहर उपनगरात दरवर्षी लाडक्या गौराईचे आगमन मोठ्या थाटामाटात होते. महिलांच्या जिव्हाळ्याचा हा सण केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीतच साजरा होईल.
2)दरवर्षी कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक, मैत्रिणी नटून-थटून मोठ्या थाटामाटात लाडक्या गौरीचे स्वागत करतात. मात्र, यावेळी गौरी सणाचा उत्साह ओसरला आहे.
3)महिलांनी घरातच फराळ बनवून गौराईची आरास मनोभावे केली आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे आमंत्रण न देता एकापाठोपाठ येणाऱ्या सर्व सणांसह ज्येष्ठा गौरी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांना मुरड घालावी लागणार आहे.
4)गौरीचे आज आगमन होत आहे, घरोघरी सजावट व विविध आरास, रोषणाई सुरू आहे. सोळा प्रकारचे पंचपक्वान्न, सोळा भाज्या व विविध फळांच्या कोशिंबिरीचा नैवेद्य गौराईला असतो. यासह पुरणपोळीचा बेतही कुटुंबीयांपुरताच राहणार आहे.