गणेश मूर्तीचे सोसायटयांच्या कुंडामध्येच विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 06:31 PM2020-08-28T18:31:38+5:302020-08-28T18:50:57+5:30

पर्यावरणपूरक विसर्जन

Gauri-Ganapati: Immersion in the pool of societies | गणेश मूर्तीचे सोसायटयांच्या कुंडामध्येच विसर्जन

गणेश मूर्तीचे सोसायटयांच्या कुंडामध्येच विसर्जन

Next

मुंबई : श्री गणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर शुक्रवारी मुंबईकरांनी गणपतीच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. विशेषत: कोरोनामुळे मोठया संख्येने विसर्जन स्थळी जाण्यास मज्जाव असल्याने गणेशभक्तांनी आपल्या सोसायटयांच्या कुंडामध्ये, कृत्रिम तलावांत विसर्जन करत आणखी एक नवा आदर्श घालून दिला. मुंबई शहरासह उपनगरात सर्वत्र विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर देण्यात आला.

मुंबईत कृत्रिम तलवांसह नैसर्गिक स्थळी विसर्जन सुरु असले तरी येथे पोलीसांचा बंदोबस्त होता. जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. कोणत्याच गणेश भक्तांस विसर्जनस्थळी आत सोडले जात नव्हते. विसर्जन स्थळी आरती झाल्यानंतर जीव रक्षक जर्मन तराफ्यांच्या मदतीने मूर्तींचे विसर्जन सुरु होते. फोर्ट, लालबाग, दादर, सायन, चेंबूर, कुर्ला, दहिसर, अंधेरी, विलेपार्ले, पवईसह लगतच्या सर्व परिसरांत मोठया प्रमाणावर कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी दुपारपासून विसर्जन सुरु असतानाच पावसानेही आपला मारा कायम ठेवला होता. दुपारपासून सुरु झालेला पाऊस सायंकाळसह रात्री ऊशिरापर्यंत कोसळत होता.
 
कोरोनाची पार्श्वभुमी लक्षात घेता, गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायांचे लगतच्या कृत्रिम तलावात किंवा सोसायटीतील कुंडामध्ये विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेने मुंबईकर नागरिकांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन सातरस्ता विभागातील हेरंब हाइट्स मधील रहिवाशांनी आपल्या  गणपतीचे विसर्जन सोसायटीमधील कुंडामध्येच करून  आदर्श निर्माण केला आहे. गणपतीच्या उर्वरित कालावधीत होणारे गणेश विसर्जनसुध्दा यापद्धतीनेच करून बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकर नागरिकांना केले आहे.
 

Web Title: Gauri-Ganapati: Immersion in the pool of societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.