लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठीच्या ८२७ कोटी ३५ लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
कोणाला मिळेल?
राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हा शिधा वितरित केला जाईल, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना शिधा मिळेल.
काय मिळेल ?
रवा, चणाडाळ, साखर (प्रत्येकी एक किलो) आणि एक लिटर खाद्यतेल.
- १,६५,६०,२५६ शिधापत्रिका धारक
कधी मिळेल?
१९ सप्टेंबर रोजी गौरी-गणपती उत्सवानिमित्त व १२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दिवाळीनिमित्त वितरित करण्यात येईल.