मुंबई :
गणपती बाप्पांसाठी अनेकांची गावी जाण्याची लगबग वाढली आहे. अशावेळी बंद घरे चोरट्याच्या टार्गेटवर आहे. त्यामुळे बाहेर जाताना आपला किमती ऐवज सुरक्षितरीत्या ठेवून घराबाहेर पडण्याचे आवाहन वेळोवेळी पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते जुलै या महिन्यात मुंबईत एकूण २३ हजार ४६० गुन्हे नोंद झाले. यापैकी १६ हजार १५५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. लॉकडाऊनचे सुरुवातीचे मुख्यत्वे करून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. या वर्षी घरफोडीच्या ७५९ गुह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ४८९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच ७ महिन्यांत हा आकडा ९८९ होता. पोलिसांकड़ून गस्त वाढवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे.
२७० घटनांचा अजूनही ‘तपास’ सुरू! गेल्या ७ महिन्यांत दाखल गुन्ह्यांपैकी अवघ्या ४८९ गुन्ह्यांची उकल झाली असून, २७० गुह्यांचा तपास सुरू आहे. रात्रीच्या सर्वाधिक घरफोड्यारात्रीच्या सुमारास एकूण ६२५ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. दिवसाढवळ्या १३४ घरफोडीच्या घटनांची नोंद आहे.पोलिसांकडून गस्तीवर भरया काळात पोलिसांकडून गस्तीवर भर देण्यात येते.
गावी जाण्यापूर्वी शेजाऱ्यांना सांगागावी जाताना शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगा, असेही आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.काय काळजी घ्याल?रक्कम, दागिने लॉकरमध्येच ठेवलेले बरे - गावी जाण्यापूर्वी रक्कम, दागिने बँक लॉकरमध्ये ठेवावे, असेही पोलिसांकडून सांगण्यात येते.