गेल्या काही दिवसांपासून गौतम पाटीलची चर्चा राज्यभरात सुरू आहे. राज्यातील तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की प्रचंड गर्दीचा माहोल असतो. यात तिच्या अदाकारीने अनेकांनी भुरळ पाडली आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलसंदर्भात एक विधान केलं होतं. इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. गौतमी पाटीलचे उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर इंदुरीकर महाराजांनी लक्ष वेधले आणि टीकाही केली होती.
गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षणही दिले जात नाही, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी खंत व्यक्त केली होती. मात्र इंदुरीकर महाराजांच्या या विधानावर गौतमी पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ते महाराज आहेत. मी त्यांच्याविषयी काय बोलणार. फक्त इंदुरीकर महाराजांचा गैरसमज झाला आहे, असं गौतमी पाटील म्हणाली. तसेच इंदुरीकर महाराज सांगतात तेवढं माझं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी देखील ध्यानात घ्यावं. मी तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे. तसेच आमच्या टीममध्ये ११ मुली आहेत. आमची एकूण २० जणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नसल्याचं गौतमी पाटीलने स्पष्ट केलं आहे.
तुमच्या पोटात दुखायचं कारण काय?- तृप्ती देसाई
तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराज यांना बीडमधील कार्यक्रमातील वक्तव्यावरुन प्रश्न विचारले आहेत. तुम्ही महिलांचा अपमान करता, बदनामी करता, शिवराळ भाषा वापरता तुमच्यावर अशी नामुष्की आली की महिलांविषयी चुकीचं बोलल्यामुळं व्हिडिओ यूट्यूबवरुन डिलीट करावे लागले आहेत, असं तृप्ती देसाई म्हणाल्या. तुम्ही ज्या महिलेविषयी बोलता गौतमी पाटील आहेत त्या लावणी करतात. तुम्ही कीर्तन करता, कीर्तनातून प्रबोधन करताना लोक जे देतील ते स्वीकारायचं असतं. तुम्हाला ५ हजार रुपये घेऊन जर कुणी बदनाम केलं जात असतं तर आम्ही आवाज उठवला असता, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.