मुंबई : मुंबईत भाजीपाल्याची आवक गेल्या काही दिवसांत वाढली आहे. परंतु गवार आणि भेंडीची आवक कमी प्रमाणात होत असल्याने या दोन भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.
यंदाच्या हंगामात अवकाळी पावसामुळे राज्यातील भाजीपाल्यावर मोठा परिणाम झाला होता. पण सध्या भाजीपाल्याचे उत्पादन वाढले असून आवकही वाढली आहे. त्यामुळे मेथी, शेपू, चवळी या पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. तर वाटण्याचे दर निम्म्यावर आले आहेत. पण आवक कमी झाल्यामुळे भेंडी आणि गवारचे दर दुप्पट झाले आहेत, असे भाजी विक्रेता लक्ष्मण बोरजे यांनी सांगितले.भाज्यांचे दर(प्रतिकिलो)भेंडी ८० रुपयेगवार ८० रुपयेफ्लॉवर ५० रुपयेकोबी ४० रुपयेमिरची ५० रुपयेशिमला मिरची ६० रुपयेवाटाणा ४० रुपयेवाल ६० रुपयेकारले ६० रुपयेमेथी २० रुपये जुडीपालक २० रुपयेशेपू २० रुपयेचवळी २० रुपयेदर कमी करावेतभाज्यांचे दर कमी झाले असले तरी वांगी, वाल, गवार, भेंडी याच्यासाठी ६० ते ८० रुपये मोजावे लागतात. ते जास्त असून कमी करायला हवे, असे ग्राहक अंकिता शिंदे म्हणाल्या.