आयपीसी परीक्षेत गीतिका हरिदास देशात पहिली
By admin | Published: August 22, 2014 01:31 AM2014-08-22T01:31:47+5:302014-08-22T01:31:47+5:30
द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियामार्फत मे व जून महिन्यात घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट इंटरमिडीएट (आयपीसी) परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला.
Next
मुंबई : द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियामार्फत मे व जून महिन्यात घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट इंटरमिडीएट (आयपीसी) परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल 9.49 टक्के लागला आहे. या परीक्षेत बंगळुरु येथील गीतिका हरिदास हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या संस्थेमार्फत दोन समूहामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेला सुमारे
66 हजार 25 विद्यार्थी बसले
होते. यापैकी 9.46 टक्के म्हणजेच
6 हजार 326 विद्यार्थी उत्तीर्ण
झाले आहेत.
पहिल्या समूहात 1 लाख 25 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 2क् हजार 537 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दुस:या समूहात 1 लाख 21 हजार 855 विद्याथ्र्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी 13.85 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बंगळुरुच्या गीतिका हरिदास हिने 81.14 टक्के गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सिकंदराबाद येथील गौरव आनंद याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. वेल्लोरच्या एस. अगस्थिवरम याने 8क्.71 गुणासह तिसरा क्रमांक पटकाविला आहे. (प्रतिनिधी)