Join us

गहना वशिष्ठचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पॉर्नोग्राफिक फिल्म्सप्रकरणी आरोपी असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ हिचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पॉर्नोग्राफिक फिल्म्सप्रकरणी आरोपी असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ हिचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला.

अटकेच्या भीतीने वशिष्ठ हिने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला. न्या. एस. के. शिंदे यांच्या एकल खंडपीठाने तिचा जामीन अर्ज फेटाळला.

पोलिसांनी गहनावर भारतीय दंडसंहिता व आयटी कायद्याच्या काही कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. मुंबई पोलिसांनी पोर्नोग्राफिक फिल्म्सप्रकरणी गहना वशिष्ठसह अनेक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा व व्यावसायिक राज कुंद्रा याचाही समावेश आहे. कुंद्रा याला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

गहनावर पोलिसांनी केलेल्या आरोपानुसार, गहना काही महिलांना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना अश्लील चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले. त्यानंतर हे चित्रपट राज कुंद्राच्या मालकीच्या हॉटशॉट या मोबाइल ॲपवर अपलोड करण्यात येत होते. दरम्यान, पोलिसांनी गहनावर आणखी एक कलम लावण्याची परवानगी मिळवण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. तर गहनाकडून आधीच सर्व पुरावे जप्त करण्यात आल्याने तिला अटक करण्याची आवश्यकता नाही, असे गहनाच्या जामीन अर्जात म्हटले होते.