- मनोहर कुंभेजकरमुंबई - रत्न आणि दागिने उद्योग हा मुंबईचा आहे, कारण वार्षिक युएसडी 37 अब्ज निर्यातीपैकी 72% हिस्सा मुंबईचा आहे. रत्न आणि दागिने उद्योगात महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असे ठाम प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी गोरेगाव येथे केले.
गोरेगाव (पूर्व ),बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को येथे जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (जीजेईपीसी) द्वारे आयोजित सर्वात मोठ्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो सिग्नेचर आणि जेम अँड ज्वेलरी मशिनरी एक्स्पो (आयआयजीएस) येथे दोन ठिकाणी (आयआयजीएस) आणि आयजिजेएमइ 2024 या दुहेरी प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी गोरेगाव येथे संपन्न झाले. यावेळी डीजिइपीच्या महासंचालक रेश्मा लखानी, डी बिअर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष पॉल रॉली, कार्यकारी,रिलायन्स ज्वेल्सचे सीईओ सुनील नायक,जीजेइपीसीचे अध्यक्ष विपुल शहा,उपाध्यक्ष किरीट भन्साळी, जीजेइपीसीचे राष्ट्रीय प्रदर्शन संयोजक नीरव भन्साळी,कार्यकारी संचालक सब्यसाची रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 पर्यंत रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीसाठी युएसडी 75 अब्ज रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. जीजेईपीसी या सर्वोच्च संस्थेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे हे उद्दिष्ट शक्य होणार असून त्यांनी भारताला जागतिक रत्न आणि आभूषण उद्योगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी एक बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र सरकारने सीप्झ मधील नवीन कॉमन फॅसिलिटी सेंटर ( सीएफसी) फक्त 17 महिन्यांत पूर्ण करण्यासाठी जीजेइपीसी सोबत जवळून काम केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
नवी मुंबई येथील न्यू इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्कसाठी महाराष्ट्र सरकार आणि जीजेइपीसी यांनी सहकार्य केले आहे आणि या उपक्रमामुळे निर्यातीचे उद्दिष्ट गाठण्यासही मदत होईल. ज्वेलरी पार्क रत्ने आणि दागिने उद्योगात नवीन परिसंस्थेची निर्मिती करेल ज्यामध्ये महाराष्ट्र एक मोठा निर्यातदार म्हणून आपला दर्जा टिकवून ठेवेल आणि रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत नवीन विक्रम प्रस्थापित करेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राने युएसडी 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले असताना, आम्ही जीजेइपीसी सोबत भारत डायमंड बोर्स सारख्या अद्वितीय संस्था निर्माण करण्यासाठी सहकार्य करत राहू असे आश्वासन त्यांनी दिले.
उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले की,जेव्हा जेव्हा जीजेईपीसी कोणतीही नवीन इकोसिस्टम तयार करेल त्यावेळी त्यांची पहिली पसंती महाराष्ट्राची असावी. ग्रामीण भारतात स्वदेशी रत्न आणि दागिने उद्योग विकसित करण्याचे त्यांनी आवाहन केले. जीजेईपीसीचे अध्यक्ष विपुल शहा म्हणाले, आता नवी मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या पाठिंब्याने ज्वेलरी पार्क सुरू झाल्याने आमचा उद्योग पुढे येण्यासाठी सज्ज होत आहे.
भारतीय रत्न आणि दागिने उद्योग 2030 पर्यंत यूएस डॉलर 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे आणि 2047 पर्यंत पहिले जागतिक राष्ट्र बनण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार होईल. विकसित भारत होण्याच्या त्या संकल्पात भाग घेणे, आमचे ध्येय असून सन 2030 पर्यंत युएसडी 75 अब्ज आणि 2047 पर्यंत युएसडी 100 बिलियन पर्यंत पोहोचेल. आम्ही उच्च उद्दिष्टे ठेवल्यामुळे या उद्योगात महाराष्ट्र देशातून निर्यातीत आघाडीवर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जीजेईपीसीचे उपाध्यक्ष किरीट भन्साळी म्हणाले की, जीजेईपीसीच्या इंडिया ज्वेलरी पार्क आणि देशातील अशा प्रकारच्या पहिल्या जेम अँड ज्वेलरी विद्यापीठाजवळील कामगारांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी जमिनीच्या अर्जावर उपमुख्यमंत्र्यांनी विचार करण्याची त्यांनी विनंती केली