Join us

खड्डेप्रकरणी पालिका महासभेत गोंधळ, सत्ताधारी विरोधक भिडले

By admin | Published: July 07, 2016 8:51 PM

पावसाळच्या पहिल्याच महिन्यात मुंबई खड्ड्यात गेल्यामुळे विरोधी पक्षांनी आज आक्रमक भूमिका घेत सभागृह दणाणून सोडले़ मात्र तीन आठवड्यातच ३५ टक्के पाऊस झाला आहे़

मुंबई , दि. ७: पावसाळच्या पहिल्याच महिन्यात मुंबई खड्ड्यात गेल्यामुळे विरोधी पक्षांनी आज आक्रमक भूमिका घेत सभागृह दणाणून सोडले़ मात्र तीन आठवड्यातच ३५ टक्के पाऊस झाला आहे़ गेल्या वर्षीच्या तुलनेत खड्डे कमी आहेत़ हे खड्डे बुजविणाऱ्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मला गर्व आहे, अशा शब्दात आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करीत दर्जेदार कामाची हमी दिली़मुंबईचे रस्ते चकाचक करण्यासाठी करोडो रुपये पालिकेने खर्च केले़ मात्र यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई खड्ड्यात असल्याचा संताप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी हरकतीच्या मुद्दाद्वारे व्यक्त केला़ या मुद्दावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन सत्ताधारी व प्रशासनाला धारेवर धरले़ घोषणाबाजी, निदर्शने, आरोप प्रत्यरोपाच्या फेऱ्या रंगल्या़ मात्र या खड्ड्यांची जबाबदारी आयुक्तांनी नाकारली़मागच्या वर्षी ५ जुलैपर्यंत मुंबईत दीड हजार खड्डे होते़ यावर्षी जूनच्या तीन आठवड्यातच पावसाच्या एकूण कोट्यापैकी ३५ टक्के पाऊस झाला आहे़ तरीही खड्ड्यांची संख्या चारशेपर्यंत आहे़ यावरुन खड्डे कमीच असल्याचे दिसून येते़ ठेकेदार न मिळाल्यामुळे हमी कालावधी वगळता अन्य खड्डे अधिकारी व कर्मचारी बुजवित आहे़ ही गर्वाची बाब असल्याचे मत व्यक्त करीत आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटली़ प्रतिनिधीदोष पावसाचा़मुंबईत दरवर्षी कोसळणाऱ्या एकूण पावसाच्या ३५ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे़ यावर्षी पावसाने २१ जूनला हजेरी लावून अवघ्या तीन आठवड्यात हा कोटा पूर्ण केला, असे निदर्शनास आणून प्रशासनाला पावसालाही दोषी ठरविले़खड्डे कमीचगेल्यावर्षी ५ जुलैपर्यंत दीड हजार खड्ड्यांची नोंद झाली होती़ यावर्षी आजच्या तारखेपर्यंत ४११ तक्रारी आल्या असून ३४३ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा आयुक्तांनी केला़ यावर्षी खड्डे बुजविण्यासाठी ३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ पेव्हर ब्लॉक कायमपेव्हर ब्लॉक काढून टाकण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला़ मात्र संपूर्ण मुंबईत पेव्हर ब्लॉक काढून टाकेपर्यंत पेव्हर ब्लॉकला पर्याय पेव्हर ब्लॉकच असणार आहे़, असे स्पष्ट करीत पेव्हर ब्लॉकचे भूत अजूनही मुंबईकरांच्या मानगुटीवर असल्याचे संकेत प्रशासनाने दिले़अधिकाऱ्यांच्या कामाचे आयुक्तांना कौतुकहमी कालावधीतील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्याचे काम त्या त्या ठेकेदारांकडून करुन घेण्यात येते़ अन्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी तीनवेळा निविदा मागविल्या़ मात्र ठेकेदार न मिळाल्याने अखेर वॉर्डातील अधिकारी व कर्मचारी खड्डे बुजवून घेत आहेत़ त्यांच्या या कामाबद्दल मला गर्व वाटतो, अशी प्रशंसा आयुक्तांनी केली़ सत्ताधारी आणि विरोधक भिडलेपुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने सत्ताधारी शिवसेनेची नाकाबंदी करण्याची व्यूहरचना विरोधकांनी आखली आहे़ प्रशासनावर अंकुश नसेल तर सत्ताधाऱ्यांनी खुर्ची खाली करावी़ पुढच्या वर्षी आम्हालाच खड्डे भरावे लागणार आहे, अशी टोलेबाजी विरोधकांनी सुरु ठेवली़ यामुळे खवळलेल्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव महापौरांच्या खुर्चीच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या़ तसे विरोधी पक्षाच्या महिला नगरसेविकाही पुढे सरसावल्या़ यामुळे दोन्ही बाजूने घोषणाबाजी व निदर्शने सुरु होऊन सभागृहात काही काळ तणाव पसरला होता़ दर्जेदार कामाची हमीकोल्डमिक्सने खड्डे बुजविण्यात येत असून प्रत्येक पाचपैकी एक नमुन्याची तपासणी केली जात आहे़ मात्र हॉटमिक्स प्रभावी असले तरी पावसाने उघडीप दिल्यानंतरच खड्डे या मिश्रणाने बुजविणे शक्य आहे़ तरीही यावेळीस रस्त्यांचे काम दर्जेदारच होणार, अशी हमी आयुक्तांनी दिली़अन्य प्राधिकरणाचे रस्तेही बघामुंबईत १२५ कि़मी़रस्ते मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या अख्यत्यारित आहेत़ तर १०० रस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहेत़ असे एकूण १४ टक्के रस्ते अन्य प्राधिकरणाकडे असून अनेकवेळा त्यांनी हस्तांतरीत केलेल्या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असते़ मात्र समन्वयाचा अभाव असल्याने खड्डे तसेच राहत होते़ यावर्षी सर्व प्राधिकरणामध्ये समन्वय असेल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले़