- अजय परचुरेमुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांसाठी ९,०१८ सदनिकांची लॉटरी नुकतीच जाहीर झाली. मात्र, या वर्षीच्या लॉटरीला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी विकासकाच्या घरांच्या किमतीपेक्षा अधिक असल्याची खंत व्यक्त करत, ग्राहकांनी या घरांकडे पाठ फिरविली आहे.म्हाडाच्या या कोकण विभागाच्या लॉटरीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी १९ जुलैपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ९३३ जणांनी अर्ज भरले. पहिल्याच दिवशीचा चांगला प्रतिसाद पाहाता, अर्ज भरणाºयांची संख्या वाढेल, असा विश्वास म्हाडाच्या अधिकाºयांना होता. मात्र, ९३३ या आकड्यावरून अर्जाची गाडी आठवडाभरात फक्त १३,९७१ अर्जांपर्यंत पुढे जाऊ शकली.म्हाडाच्या कोकण विभागाने विरार-बोळींज, कल्याण, मिरा रोड, ठाणे, अंबरनाथ या भागांतील घरांचा या लॉटरीत समावेश केला आहे. मात्र, येथील घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाºया नसल्याने आॅनलाइन अर्जनोंदणीकडे त्यांनी पाठ फिरविली. विरार-बोळींज भागात अल्प उत्पन्न गटात सर्वाधिक ३,७१८ घरे आहेत. मात्र, या घरांची किंमतही २७ लाखांच्या घरांत आहे. ती अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी नाही.आपले हक्काचे घर असावे, या स्वप्नपूर्तीसाठी सामान्य परवडणाºया म्हाडाच्या घरांकडे पाहतात. परंतु, आता म्हाडाचे घरही महाग झाल्याची खंत सर्वसामान्यांमध्ये आहे.म्हाडाचे घर आवाक्याबाहेरचेविरार-बोळींज भागात अल्प उत्पन्न गटात सर्वाधिक ३,७१८ घरे आहेत. मात्र, या घरांची किंमत ही २७ लाखांच्या घरांत आहे. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना इतके महागडे घर परवडणारे नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.
म्हाडाच्या घरांकडे सर्वसामान्यांची पाठ; कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 1:32 AM