Join us

युवा पिढी तंबाखू सेवनाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 2:28 AM

जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, राज्यात गेल्या सात वर्षांच्या तुलनेत यंदा तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामध्ये घट झालेली दिसून येते.

मुंबई : जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, राज्यात गेल्या सात वर्षांच्या तुलनेत यंदा तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामध्ये घट झालेली दिसून येते. मात्र, १५ ते १७ वयोगटात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराच्या टक्केवारीत २०१०च्या तुलनेत (२.९ टक्के) २०१८मध्ये ती ५ टक्के इतकी वाढली आहे. म्हणजेच ही वाढ सापेक्ष ९० टक्के इतकी आहे.हे चिंतेचे कारण असून त्याचे दुष्परिणाम राज्यातील सार्वजनिक आरोग्यावर होत आहेत. राष्ट्रीय स्तरावर १५ ते १७ वयोगटासाठी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची ५४ टक्के इतकी सापेक्ष वाढ होती. राज्यात तंबाखूच्या वापराच्या सुरुवातीच्या वयोगटाची सरासरी वय १८ ते १५ वर्षे होते. हा वयोगट १७.४ वर्षे असा कमी झाला. मात्र, तंबाखू सेवन करणाºयाचे राष्ट्रीय स्तरावरील वयोमान वर्ष १७.९ ते १८.९पर्यंत वाढले आहे. याचाच अर्थ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचा दर युवकांमध्ये वाढला आहे. देशात दररोज ५५ हजार तंबाखू सेवन करणारी मुले आहेत. पैकी राज्यात दररोज ५२९ मुले पहिल्यांदा तंबाखूचा वापर करतात.बारा महिन्यांत ५०% मृत्यूजी मुले लहान वयात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सुरू करतात त्यांच्यापैकी केवळ ५ टक्केच वापरकर्ते व्यसन सोडू शकले आहेत. तंबाखू हे मृत्यूचे सर्वांत जवळचे कारण आहे. देशात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाची जवळपास १ लाख नवीन प्रकरणे समोर येत असतात. ज्यापैकी ५० टक्केमृत्यू १२ महिन्यांत होतात, ही खेदाची बाब आहे. - डॉ. पंकज चतुर्वेदी,टाटा मेमोरियल रुग्णालय(प्राध्यापक, कर्करोगतज्ज्ञ)सर्वत्र कोटपा कायद्याचे अनुपालन करणारमहाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने या आव्हानाची जाणीव करून दिली आहे. सीओटीपीए (द सिगारेट्स अ‍ॅण्ड अन्य तंबाखू उत्पादने कायदा)च्या अनुरूप शाळेची गुणवत्ता वाढवण्याकरता एक कौतुकास्पद काम केले आहे. कोटपा कायद्याच्या आधारे सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त होऊ शकतात. या कायद्याचे पालन करणाºया शाळांच्या संख्येत लक्षणीय वाढ करणार आहोत, तसेच शाळांमध्ये तंबाखूविरोधी कार्यक्रमांना प्रोत्साहन देणार आहोत.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

टॅग्स :धूम्रपान