Join us  

जेणु काम तेणु थाय, बाकी गोता खाय - नारायण राणो

By admin | Published: October 11, 2014 11:11 PM

माजी उद्योगमंत्री नारायण राणो यांनी गुजरात भाषेतील जेणु काम तेणु थाय, बाकी गोता खाय या म्हणीचा उल्लेख करुन भाजपाची खिल्ली उडवली.

भाईंदर : काँग्रेसने गेल्या 15 वर्षात केलेले काम आयत्या बिळावर नागोबा झालेल्या भाजपाने आपणच केल्याचा संभ्रम जनतेत निर्माण करणो सुरु ठेवल्याने, येत्या निवडणुकीत भाजपा नेस्तनाबुत होऊन काँग्रेसच सत्तेवर येणार असल्याचा दावा माजी उद्योगमंत्री नारायण राणो यांनी गुजरात भाषेतील जेणु काम तेणु थाय, बाकी गोता खाय या म्हणीचा उल्लेख करुन भाजपाची खिल्ली उडवली.
राणो हे मीरा-भाईंदर व ओवळा-माजिवडा मतदार संघातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलत होते. भाजपाच्या असत्येवर आधारीत जाहिरातबाजीची टिंगल करीत त्यांनी छत्रपतींचा आशिर्वाद, चलो मोदी के साथ या बॅनरबाजीवरही कोटी केली. भाजपाने गेली लोकसभा केवळ जाहिरातीच्या माध्यमातुन जिंकुन त्या जाहिरातींवर तब्बल 55 हजार कोटींचा खर्च केल्याचा गोप्यस्फोट करुन भाजपाच्या खात्यात केवळ 9क्क् कोटी असताना हा खर्च आला कुठुन, असा सवाल राणो यांनी केला. काँग्रेसच्या कार्यकाळात स्थानिक शेतकय््रांच्या कांद्याची निर्यात 4 हजार 5क्क् कोटींवर गेली असताना मोदींच्या काळात ती केवळ 8क्क् कोटींवर आली आहे. परदेशी कांद्याची खरेदी गुजरातच्या व्यापाय््रांकडुन करुन त्याची साठवणुक महाराष्ट्राच्या कोल्ड स्टोरेजमध्ये केल्याने स्थानिक शेतकय््रांचा कांदा रस्त्यावर सडत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी महाराष्ट्रातील बंदर किनाय््रावरील वाहतुक पुर्णपणो गुजरातमध्ये स्थलांतरीत करुन तेथील सुमारे 75 हजार कोटींची 18क्क् एकर जमीन विना वापर पडु दिल्याचे सांगितले. अलिकडेच मोदींनी अमेरीकेचा दौरा करुन तेथील कॉन्फरन्समध्ये केलेले हिंदी भाषण अमेरीकन ऐवजी भारतीयांपुढेच केल्याचा दावा केला. बडय़ा औषध कंपनींना फायदा मिळवुन देण्यासाठी मोठय़ा आजारांतील 1क्8 आजारांवरील अत्यावश्यक औषधांना यादीतुन वगळल्याने हि औषधे मोठय़ा किंमतीत खरेदी करावी लागणार असल्याचे सांगत भाजपा प्रणित मोदी सरकार खोटारडे असल्याचे सांगितले. शिवसेनेबाबत बोलताना त्यांनी युती तुटल्याने उद्धव अस्वस्थ झाले. पुढे त्यांनी मी मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगुन टाकले, त्याचा त्यांना अनुभव तरी आहे का, असा सवाल करीत यंदाच्या निवडणुकीत त्यांना 5 जागांपेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याचा दावा केला. राष्ट्रवादी एक नंबरची भ्रष्टाचारी असुन त्यांच्या नेत्यांना खड्डा दिसला कि, त्यात ते काहीतरी करत असतात, असे बोलुन त्यांच्या सभेला महिलांनी जाऊ नये, असे आवाहन केले. काँग्रेसने केलेल्या कामगिरीला हायजॅक करुन आयत्या बिळावर बसलेल्या भाजपाला यंदाच्या निवडणुकीत मते न देता काँग्रेसलाच सत्तेवर आणण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी आ. मुझफ्फर हुसेन, उमेदवार प्रभात पाटील, याकुब कुरेशी, माजी महापौर तुळशिदास म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.  (वार्ताहर)