भूगोलाचे सर्वेक्षण करता येणार एका क्लिकवर , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाइल अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:23 AM2020-09-03T06:23:14+5:302020-09-03T06:23:41+5:30

आतापर्यंत १,५५५ विद्यार्थी, तर ५६७ शिक्षकांनी या अ‍ॅपसाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे बालभारती मंडळाकडे आतापर्यंत या अ‍ॅपच्या माध्यमातून १०९९ सर्वेक्षणाचीही नोंद झाली आहे. यंदा बारावीला मानवी भूगोल असल्याने अभ्यासक्रमात सर्वेक्षण गरजेचे आहे.

Geography survey can be done with a single click, a mobile app for 12th standard students | भूगोलाचे सर्वेक्षण करता येणार एका क्लिकवर , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाइल अ‍ॅप

भूगोलाचे सर्वेक्षण करता येणार एका क्लिकवर , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाइल अ‍ॅप

googlenewsNext

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून भूगोलाच्या अभ्यासादरम्यान करावे लागणारे सर्वेक्षण मोबाइलच्या एका क्लिकवर शक्य होईल. भूगोलाच्या बारावीच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि आवश्यक गरजा लक्षात घेऊन बालभारतीने या मोबाइल अ‍ॅपची निर्मिती केली आहे.
आतापर्यंत १,५५५ विद्यार्थी, तर ५६७ शिक्षकांनी या अ‍ॅपसाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे बालभारती मंडळाकडे आतापर्यंत या अ‍ॅपच्या माध्यमातून १०९९ सर्वेक्षणाचीही नोंद झाली आहे. यंदा बारावीला मानवी भूगोल असल्याने अभ्यासक्रमात सर्वेक्षण गरजेचे आहे.
जे विद्यार्थी अभ्यासक्रमात शिकत आहेत त्याची समाजामध्ये जाऊन चाचपणी सर्वेक्षणाद्वारे करायची आणि जी सांख्यिकी माहिती जमा होईल त्याचा वापर करून विश्लेषण करायचे, ही कार्यपद्धती सर्वेक्षणामध्ये समाविष्ट असते. आधी हे सर्वेक्षण घरोघरी जाऊन पेन, वहीच्या साहाय्याने केले जात होते. आता त्यासाठी मोबाइल अ‍ॅपचा वापर होईल. बालभारती संचालकांची याला मान्यता मिळाल्याची माहिती बालभारतीचे भूगोल विषयाचे विशेषाधिकारी रवी जाधव यांनी दिली.
भूगोलाच्या शिक्षकांना अ‍ॅपच्या लिंक पाठविल्या असून, त्यांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे जाधव म्हणाले. ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर तसेच गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

अशी कार्यान्वित होणार प्रणाली
अ‍ॅपमध्ये जिओ टीचर हे एक शिक्षकांसाठी तर दुसरे जिओ सर्वेक्षण हे विद्यार्थ्यांसाठी अशी दोन प्रकारची अ‍ॅप बनविली गेली आहेत. शिक्षकांनी शाळेचा यू डायस क्रमांक आणि स्वत:चा मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर त्यांना जो कोड मिळेल, तो त्यांनी विद्यार्थ्यांना द्यायचा आहे.
विद्यार्थी तो त्यांच्या मोबाइल अ‍ॅपमध्ये टाकतील, ज्यामुळे शिक्षक हे विद्यार्थ्यांशी आपोआप कनेक्ट होतील. यामुळे विद्यार्थी कुठले सर्वेक्षण करीत आहे, किती बाकी आहे, याची इत्थंभूत माहिती शिक्षकांना मिळेल व मूल्यांकन करणे सोपे होईल.

विद्यार्थ्यांना केवळ
15 घरांचे सर्वेक्षण करायचे आहे. ते ज्या कुटुंबांचे सर्वेक्षण करतील त्यांच्यासोबत त्यांना सेल्फी काढायचा आहे. यामुळे त्या ठिकाणचे जिओ लोकेशन टॅग होऊन तेथील नकाशाचा डेटा तयार होईल.

Web Title: Geography survey can be done with a single click, a mobile app for 12th standard students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.