CoronaVirus News: जर्मनीत 'मुट्टी'नं देशाला कोरोनातून तारलं; अँजेला मार्केल यांच्या प्रयत्नांना यश मिळालं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 04:07 AM2020-05-01T04:07:37+5:302020-05-01T06:40:53+5:30

जर्मनीत स्थायिक असलेले अमित गोरे ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते. जर्मनीत आईला लाडाने मुट्टी म्हणतात.

In Germany, 'Mutti' saved the country from the Corona; Angela! | CoronaVirus News: जर्मनीत 'मुट्टी'नं देशाला कोरोनातून तारलं; अँजेला मार्केल यांच्या प्रयत्नांना यश मिळालं!

CoronaVirus News: जर्मनीत 'मुट्टी'नं देशाला कोरोनातून तारलं; अँजेला मार्केल यांच्या प्रयत्नांना यश मिळालं!

googlenewsNext

संदीप शिंदे
मुंबई : ती या देशाची मुट्टी आहे. अत्यंत हुशार, समंजस, धोरणी आणि धाडसी. स्वत: शास्त्रज्ञ असल्याने अचाट बुद्धिमत्ता आहे. तिला कल्याणकारी राज्य करणारा हुकूमशाहसुद्धा म्हटले जाते. तिच्याच करारी नेतृत्वामुळे जर्मनीतला कोरोनाचा प्रकोप अन्य युरोपीयन देशांच्या तुलनेत कमी आहे. या संकटाचा नेटाने मुकाबला करण्याचे समार्थ्य जनतेला तिच्याकडूनच मिळाल्याचे जर्मनीत स्थायिक असलेले अमित गोरे ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते. जर्मनीत आईला लाडाने मुट्टी म्हणतात. ही मुट्टी आहे अर्थातच जर्मनीच्या पंतप्रधान एंजेला मार्केल.
फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ६५ हजार पोहचली असून, तिथल्या बळींची संख्या २३ हजार ६०० आहे. तर, इटली आणि स्पेननेही अनुक्रमे २४ हजार २७५ आणि २७ हजार ३५९ जणांना गमावले आहे. जर्मनीत १ लाख ६० हजार रुग्ण असतानाही मृतांचा आकडा मात्र ६,३१४ इतका आहे.
इटली आणि ब्रिटनमध्ये मृत्यू दर अनुक्रमे ९ आणि ४.२ टक्के असताना जर्मनीत मात्र तो ०.३ टक्केच आहे. उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. या रोगाचा धोका मार्केल यांनी वेळीच ओळखला होता. पहिला रुग्ण फेब्रुवारी महिन्यात आढळला. परंतु, त्याआधीच संभाव्य धोका ओळखून तपासणी आणि उपचारांची व्यवस्था देशात सुरू झाली होती. चाचण्यांवर मोठ्या प्रमाणात भर दिला गेला. आठवड्याला पाच लाखांपर्यंत चाचण्या होत होत्या. घरोघरी जात टेस्टिंग करणाºया टॅक्सी सुरू झाल्या.
अर्थसाह्यासाठी कुर्झअर्बिट
जर्मनी हे जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्था असलेले राष्ट्र आहे. कोरोना संकटामुळे इथले उद्योग लॉकडाऊन झाल्याने देशावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. मात्र, त्यातून बाहेर पडण्याची क्षमताही या देशात आहे. या परिस्थितीत देशातील जनतेला सरकारने आर्थिक मदत दिली आहे. हाताला काम नसले तरी त्यांना कुर्झअर्बिट दिले जाते. म्हणजेच ६० ते १०० टक्के वेतनाची रक्कम त्यांना मिळते.
जर्मनीची आरोग्य व्यवस्था अत्यंत बळकट आहे. रुग्णांसाठी पुरेशी रुग्णालये आणि वैद्यकीय सेवा आहेत. त्यामुळेच फ्रान्सच्या पूर्व भागासह इटलीतल्या काही रुग्णांना एअर लिफ्ट करून जर्मनीतच उपचारांसाठी आणले होते. स्वत: संकटात असताना शेजारी राष्ट्राला मदत करण्याचे
हे जगातील एकमेव उदाहरण असेल असेही गोरे यांनी नमूद केले.

Web Title: In Germany, 'Mutti' saved the country from the Corona; Angela!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.