शिक्षेविरुद्ध जेरिट जॉन हायकोर्टात

By admin | Published: October 23, 2015 02:31 AM2015-10-23T02:31:25+5:302015-10-23T02:31:25+5:30

प्रेयसीवर अ‍ॅसिडहल्ला केल्याप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने चित्रपट व्यावसायिक जेरिट जॉनला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. या निर्णयाविरुद्ध जेरिटने उच्च न्यायालयात

Gerrit John Hycort against the punishment | शिक्षेविरुद्ध जेरिट जॉन हायकोर्टात

शिक्षेविरुद्ध जेरिट जॉन हायकोर्टात

Next

मुंबई : प्रेयसीवर अ‍ॅसिडहल्ला केल्याप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने चित्रपट व्यावसायिक जेरिट जॉनला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. या निर्णयाविरुद्ध जेरिटने उच्च न्यायालयात अपील केले आहे.
संबंधित रसायन अ‍ॅसिड नसल्याचे न्यायालयाने लक्षात घेतले नाही. पीडितेला साधी जखम झाली होती. आधीपासूनच पीडिता डोळ्यावर उपचार घेत होती, ही परिस्थिती न्यायालयाने शिक्षा देताना लक्षात घेतली नाही आणि याच आधारावर अपील केले, असे जेरिटचे वकील अमिन सोलकर यांनी सांगितले. यावरील सुनावणी १७ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

Web Title: Gerrit John Hycort against the punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.