पुस्तकासाठी अनुदान मिळवा अन् लेखक बना; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवलेखकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 10:42 AM2024-02-12T10:42:39+5:302024-02-12T10:45:07+5:30
२०२४ या वर्षासाठीच्या अनुदानासाठी नवलेखकांनी अर्ज पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे.
मुंबई : ज्याचे आजपर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे अनुदान देण्यात येते. यासाठी २०२४ या वर्षासाठीच्या अनुदानासाठी नवलेखकांनी अर्ज पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर भल्या मोठ्या पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त करण्याऐवजी तरुण पिढीतील तरुण तरुणींसाठी लिहिते होण्यासाठी ही संधी शासनाने उपलब्ध केली आहे. याची अधिक माहिती साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर मिळेल.
या वाङमय प्रकारांसाठी मिळेल अनुदान :
एक कविता, कथा, नाटक/एकांकिका, कादंबरी, बालवाङमय, वैचारिक लेख/ललित लेख/चरित्र/आत्मकथन/प्रवास वर्णन या सहा वाङमय प्रकारातील पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वरील पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित (टाइप) मजकुराला अनुदान देण्यात येईल.
हे लक्षात ठेवा :
या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील शासनाच्या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ याअंतर्गत नवलेखक अनुदान
योजना माहितीपत्रक व अर्ज या शीर्षकाखाली, तसेच मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नवलेखकांनी आपले अप्रकाशित साहित्य मुद्रित स्वरूपात पाठवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे.
नवलेखकांनी त्यांचे साहित्य सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-400 025 येथे पाठवावे.
इथे करा अर्ज :
किमान पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे, तसेच कमाल पृष्ठसंख्येपेक्षा जास्त पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास या मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही. याची अधिक माहिती साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर मिळेल.