Join us

मागाठाणे विधानसभेची विकासकामे लवकर मार्गी लावा - शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:07 AM

मुंबई : मागाठाणे विधानसभेची विविध विकासकामे लवकर मार्गी लावा, असे निर्देश राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी ...

मुंबई : मागाठाणे विधानसभेची विविध विकासकामे लवकर मार्गी लावा, असे निर्देश राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

येथील विविध प्रश्नांबाबत एकनाथ शिंदे यांच्या दालनात आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समवेत संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली.

या वेळी आमदार सुर्वे यांनी मागाठाणे विधानसभेतील सिद्धार्थनगर, माता-बालक रुग्णालय ते मागाठाणे वाचनालय येथील नगरविकास आराखड्यातील जमीन भूसंपादित करावी, गार्डन फॅक्टरी सिद्धार्थनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग बोरीवली पूर्व येथील विकास नियोजन आराखड्यातील प्रस्तावित रस्त्याची जमीन संपादित करावी, शनी मंदिर ते नॅन्सी डेपो बोरीवलीपर्यंतचा वर्षानुवर्षे रखडलेला रस्ता लवकर बनवावा, शाखा क्र. १२ श्री श्री रविशंकर शाळेशेजारी बृहन्मुंबई महानगरपालिका मैदानातील जलतरण तलाव लवकर तयार करावा, समतानगर मेट्रो स्थानक ते समतानगर कांदिवली (पू.) पर्यंत स्कायवॉक बांधून द्यावा या विविध विकासकामांबाबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीला नगरविकास (१) चे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास (२) चे प्रधान सचिव पाठक, एम.एम.आर.डी.ए.चे सहआयुक्त बी.जी. पवार, विकास नियोजन विभागाचे उपमुख्य अभियंता पाडगावकर, कार्यकारी अभियंता निकम, नगरसेवक संजय घाडी, नगरसेविका रिद्धी खुरसंगे, नगरसेविका गीता सिंघण, महिला विधानसभा संघटक शुभदा शिंदे, उपविभागप्रमुख चेतन कदम, माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे, संजय सिंघण, महिला उपविभाग संघटक शीला गांगुर्डे, शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामाणकर, अशोक परब, महिला शाखा संघटक कांचन सार्दळ, अनिल दबडे, ऋषी सुर्वे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.