संचालकांना पकडा, १ लाख मिळवा’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 05:46 AM2018-01-06T05:46:50+5:302018-01-06T05:47:44+5:30

कमला मिल आग प्रकरणातील वन अबव्हच्या संचालकांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आता त्यांना पकडण्यासाठी त्यांचे फोटो जाहीर करून त्यांचा शोध घेणाºयांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Get Directors, Get 1 Million ' | संचालकांना पकडा, १ लाख मिळवा’  

संचालकांना पकडा, १ लाख मिळवा’  

Next

‘मुंबई : कमला मिल आग प्रकरणातील वन अबव्हच्या संचालकांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आता त्यांना पकडण्यासाठी त्यांचे फोटो जाहीर करून त्यांचा शोध घेणाºयांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
कमला मिल आग प्रकरणी वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, जीगर संघवी आणि अभिजित मानकरसह व्यवस्थापकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या दिवसांपासूनच तिघेही संचालक पसार झाले. परदेशी पळून जाऊ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली. मात्र आठवडा उलटत आला तरी या तिघांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलेले नाही.

ते स्वच्छतागृहही अनधिकृत

कमला मिल आग प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी एमआरटीपीअंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. यामध्ये वन अबव्ह, मोजोज् आणि रघुवंशी मिलमधील पी-२२ यांचा समावेश होता. यातील दोन गुन्ह्यांत कमला मिलचा मालक रमेश गोवानीच आरोपी आहे.

चौकशीसाठी हजर राहण्याबाबत गोवानीला समन्स बजाविण्यात आले होते. गोवानीचा याबाबत जबाब नोंदविण्यात आला आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात स्वत:वरील आरोप फेटाळून लावले आहेत.
 

Web Title: Get Directors, Get 1 Million '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.