Join us

दिव्यातील जलदचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2016 2:13 AM

दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करताना एमआरव्हीसीने नवे फलाट बांधण्याचे नियोजन केले. मात्र हे काम रखडले होते. अखेर आॅक्टोबरपर्यंत

मुंबई : दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करताना एमआरव्हीसीने नवे फलाट बांधण्याचे नियोजन केले. मात्र हे काम रखडले होते. अखेर आॅक्टोबरपर्यंत काम मार्गी लागून दिवा येथे जलद लोकल गाड्यांना थांबा मिळेल, असा दावा एमआरव्हीसीकडून करण्यात आला आहे.गाड्यांना विलंब झाल्यामुळे दिवा स्थानकात गेल्या वर्षी उग्र आंदोलन झाले. दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्याची मागणी प्रवाशांनी उचलून धरली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी थांबा देण्याची घोषणा केली. मात्र त्या कामाचा वेग मध्यंतरी मंदावला. अखेर या कामाला एमआरव्हीसीकडून गती देण्यात आली. दिवा स्थानकात धिम्या तसेच जलद मार्गिका बदलतानाच जलद मार्गावरील फलाट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले. तर मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या लोकलच्या फलाटावर कल्याणकडे जाणाऱ्या लोकल थाबंतील. अनेक कामे पूर्ण झाली आहेत. काम आॅक्टोबरपर्यंत पूर्ण झाले तरी जलद गाड्यांना थांबा कधी मिळेल, हे आता सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)मोठा ब्लॉक घ्यावा लागणारनव्या मार्गिका जुन्या मार्गिकांना जोडण्यासाठी मोठा ब्लॉक घ्यावा लागेल. त्यानंतरच जलदला थांबा मिळणार आहे. या स्थानकाच्या पश्चिमेला प्लॅटफॉर्म क्रमांक १च्या बाजूला जलद मार्गिका व प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. त्यामुळे आता कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेवर यापुढे भविष्यात मुंबईकडे जाणाऱ्या धिम्या गाड्या सोडल्या जातील, असे सहाय म्हणाले.