मुंबई : जेट एअरवेजच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करा, अशी मागणी करणारे पत्र आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार फेडरेशन (आयटीएफ)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. जेट एअरवेज बंद पडल्याने कर्मचारी व अधिकाºयांच्या नोकºया बुडाल्या असून, त्यांच्यासमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. पंतप्रधानांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहावे व जेटच्या कर्मचाºयांना त्यांचे थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळवून द्यावी, तसेच त्यांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आयटीएफने केली.लंडन येथे मुख्यालय असलेल्या आयटीएफने जेटच्या कर्मचाºयांच्या समस्यांची दखल घेत, त्या पंतप्रधानांना कळविल्या आहेत. जेटचे वरिष्ठ कर्मचारी, अधिकारी, तंत्रज्ञ व वैमानिकांना जानेवारीपासूनचे वेतन मिळालेले नाही, तर इतर कर्मचारी व अधिकाºयांना मार्च महिन्याचे वेतन मिळालेले नाही. कामगारांचे कोणतेही हक्क डावलले जाऊ नयेत व त्यांना त्यांची सर्व देणी लवकरात लवकर मिळावीत, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आयटीएफने केली आहे.>पंतप्रधानांचे लेखी उत्तरफेडरेशन आॅफ आॅल इंडिया एव्हिएशनने (एफएआयए) जेट बंद पडल्याने उद्भवलेल्या समस्येबाबत आयटीएफचे लक्ष वेधले होते व पंतप्रधानांना पत्र पाठविले होते. पंतप्रधान कार्यालयाकडून त्याची दखल घेण्यात आली असून, लवकरच या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी उत्तर पाठविण्यात आल्याची माहिती एफएआयएचे अध्यक्ष प्रदीप मेनन, सरचिटणीस नितीन जाधव व मुख्य संघटक किशोर चित्राव यांनी दिली.
जेटच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या, हस्तक्षेप करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 6:01 AM