Join us

‘मल्ल्याच्या संपत्तीची माहिती मिळवा’

By admin | Published: February 05, 2017 12:36 AM

देशातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेल्या विजय मल्ल्याची इंग्लंडमधील संपत्तीची तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी विशेष पीएलएमए

मुंबई : देशातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेल्या विजय मल्ल्याची इंग्लंडमधील संपत्तीची तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी विशेष पीएलएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिग अ‍ॅक्ट) न्यायालयाने यू. के. सरकारला पाठवण्यासाठी लेटर आॅफ रोगेटरी (एलआर) काढले आहे. विजय मल्ल्या फरार झाल्यानंतर देशातील वेगवेगळ्या न्यायालयांनी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले, तरीही मल्ल्या देशात परत येण्यास तयार नाही. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याची देशातील संपत्तीवर टाच आणण्याचे काम सुरू केले आहे. तरीही मल्ल्यावर फारसा परिणाम होत नसल्याने, ईडीने त्याची इंग्लंडमधील संपत्तीची माहिती देण्यासाठी एलआर काढण्याची विनंती विशेष न्यायालयाला केली. बँकांकडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेतून मल्ल्याने इंग्लंडमध्ये संपत्ती खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे संपत्तीची तपशीलवार माहिती मिळणे आवश्यक आहे. शनिवारी विशेष न्यायालयाने ईडीची विनंती मान्य करत, इंग्लंड सरकारला पाठवण्यासाठी लेटर आॅफ रोगेटरी काढले आहे. (प्रतिनिधी)